आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्‍या रस्‍त्‍यांवर दिसणार रियल लाईफ 'मर्दानी' ची अ‍ॅक्‍शन, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या राणी मुखर्जीचा आगामी चित्रपट 'मर्दानी'ची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपटात राणी पोलिस अधिका-याची भूमीका करणार आहे. कायदा तोडणा-याला 'मर्दानी' चांगला धडा शिकवते, अशा आशयाचा हा चित्रपट आहे. या चित्रटपाटाबरोबरच आता मुंबईच्‍या रस्‍त्‍यावर मर्दानी पोलिस महिला कायदा तोडणा-यांना इंगा दाखवणार आहेत.
यासाठी मुंबई पोलिस प्रशासनाने 'लेडी बीट मार्शल' नावाची महिला पोलिसांची टीम तयार केली आहे. या कार्यक्रमासाठी ग्रहमंत्री आर. आर. पाटील, डीजीपी संजीव दयाल, पोलिस आयुक्‍त राकेश मारिया, अभिनेत्री राणी मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांना त्रास देणारे, रोड रोमियो, चोर यांना धडा शिकवण्‍याचे काम बीट मार्शल करणार आहे.
सर्व प्रकारची ट्रेनिंग -
लेडी बीट मार्शलमध्‍ये काम करणा-या महिला पोलिसांना मोटारसायकल चालवणे, गन चालवणे, शत्रूपासून बचाव करण्‍याबरोबरच महिलांची छेडछाड होत असेल तर, अशा वेळी काय करायला हवे याचे प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.
लेडी बीट मार्शल टीम-
-या टीममधील महिला पोलिसकर्मीचे वय 22 ते 28 वर्षे आहे.
- सर्व महिलांना स्‍पोर्ट्स बायीक देण्‍यात आल्‍या आहेत.
- आधुनिक प्रकारचे शस्‍त्र, वॉकी-टॉकी आणि मोबाईल देण्‍यात आले आहे.
- सर्वाना जूडो-कराटेचे प्रशिक्षण देण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा मर्दानी महिलांच्‍या बीट मार्शलची फोटो...