आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुबंई लोकलमध्‍ये महिला खेळल्‍या गरबा, सोशल मीडियावर Video Viral

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबई शहरात कित्‍येक तास मुंबईकरांना लोकलमध्‍ये खर्ची घालावे लागतात. मुंबईमध्‍ये दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. पहाटे चार वाजल्यापासून मुंबईची ही जीवनवाहिनी सुरू होते ती, रात्री 1 वाजेपर्यंत. काही ट्रेनतर रात्री अडिच वाजेपर्यंत सुरू असतात. या लोकलमध्‍ये कधी जागेसाठी भांडणारे मुंबईकर दिसतात. मात्र सध्‍या नवरात्रोत्‍सव सुरू असल्‍याने काही महिलांनी चक्‍क लोकलमध्‍ये दांडिया नृत्‍य केले आहे. सोशल मीडियावर हा व्‍हिडीओ नुकताच viral झाला आहे. लोकलमधील महिलांच्‍या डब्‍यात महिलांनी मोबाइलवर गाणी लावून डान्‍स केला. मिळालेला संधीचा कसा लाभ घ्‍यावा, हे या प्रसंगातून नक्‍कीच शिकायला मिळेल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..