आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Creat Ruckus At MIDC Police Station Of Mumbai

VIDEO : तरुणीने पोलिस ठाण्‍यातच ढोसली दारू, घातला गोंधळ, पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांसमोर दारू प्राशन करताना सुनीता. - Divya Marathi
पोलिसांसमोर दारू प्राशन करताना सुनीता.
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी नशेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणीवर पोलिसांनी कारवाई केली. त्‍यामुळे तिने चिडून पोलिस ठाण्‍यातच अधिकारी, शिपाई यांच्‍यासमोर तोंडाला बॉटल लावून बीअर प्राशन केली. एवढेच नाही तर मोठा गोंधळ घातल पोलिसांना धमकीसुद्धा दिली. ही घटना 17 सप्‍टेंबरला घडली असून, या बाबत एका इंग्रजी वृत्‍तपत्राने आज (सोमवार) बातमी प्रकाशित केली. या प्रकाराचा व्‍हीडिओसुद्धा समोर आला आहे. सुनीता यादव असे या तरुणीचे नाव आहे.
अनेक वेळ घातला गोंधळ
सुनीता हिने 17 सप्‍टेंबरला दारूच्‍या नशेत पहाटे 3 वाजताच्‍या सुमारास एका रेस्टोरेंट बाहेर नशेमध्‍ये गोंधळ घातला. त्‍यामुळे पोलिसांनी तिला 1200 रुपये दंड ठोठवला आणि पोलिस ठाण्‍यात आणले. मात्र, पोलिस ठाण्‍यातही सुनीता शांत बसली नाही. तिने आपला गोंधळ सुरूच ठेवला आणि बीअरच्‍या दोन बॉटल प्राशन केल्‍या. नंतर पोलिसांना धमकीसुद्धा दिली. अतरिक्‍त पोलिस निरीक्षक तानाजी तेलवेकर यांनी सांगितले की, महिला पोलिसांनी सुनीताची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, ती ऐकण्‍याच्‍या मनस्थितीत नव्‍हती. प्रकरण वाढत असल्‍याचे पाहून ड्यूटीवर असलेल्‍या एका कर्मचाऱ्याने याचे चित्रिकरण केले.
नोकरीवरून काढण्‍याची धमकी दिली
व्‍हीडियोमध्‍ये सुनीता म्‍हणते, "ओ मॅडम माझे नाव सुनीता आहे. मी हरियाणाची आहे." पुढे ती पोलिसांना नोकरीवरून काढण्‍याची धमकीही देते. या प्रकरणानंतर थकून ती पोलिस ठाण्‍यातील एका कोपऱ्यात झोपी गेली. सकाळी तिला जाग आल्‍यानंतर तिने हात जोडून पोलिसांची माफी मागितली. पोलिसांनी सुनीतावर मुंबई गुन्‍हा दाखल केला.

पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...