आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बिझनेस गर्लने 5 हजारांत सुरु केले होते स्टार्टअप, आज 50 कोटींमध्ये खेळतेय कंपनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज (8 मार्च) जागतिक महिला दिन आहे. या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी एका होतकरु तरुणीची यशोगाथा सांगत आहोत. सुप्रिया साबू हिने परिश्रम आणि सचोटीच्या जोरावर समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. देशातील इतर महिलांसाठी ती रोल मॉडल बनली आहे. तिने 5 हजार रुपयांत छोटासा बिझनेस सुरु केला आहे. आता तिच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 50 कोटींच्या घरात आहे.

सुप्रियाला बँकेने कर्ज देण्यास दिला होता नकार...
- सुप्रिया साबू हिने फाइन आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. पण तिला नोकरी करायची नव्हती. काही तरी वेगळे करावे, या विचाराने तिला झपाटले होते.
- सुप्रियाने 2009 मध्ये स्टार्टअप सुरु करण्‍याचा निर्णय घेतला.
- सुप्रियाने 5 हजार रुपये गुंतवून 'मास्टर स्ट्रोक अँडर्व्हटायझिंग' नामक कंपनी सुरु केली.

वडिलांनी दिले पंखांना बळ...
- सुप्रियासाठी अॅडर्व्हटायझिंगचा बिझनेस नवा होता. सुरुवातील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण ती खचली नाही.
- तिने बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार केला. पण तिला एकाही बँकेने उभे केले नाही.
- त्रस्त सुप्रियाला तिच्या वडिलांकडून आर्थिक मदतीचे बळ मिळाले.
50 कोटींमध्ये खेळते सुप्रियाची कंपनी...
- सुप्रियाची कंपनी 'मास्टर स्ट्रोक अॅडर्व्हटाईझिंग'ला हळूहळू सरकारी आणि खासगी क्षेत्रातील टेंडर मिळू लागले.
- कंपनीने जोमाने काम सुरु केले. वेब डिझायनिंग, ग्राफिक, मार्केटिंग, कॉर्पोरेट प्रेझेंटेशनचेही तिने काम हाती घेतले.
- 2012 मध्ये तिने ई-कॉमर्ससोबत व्यावसायिक मैत्री केली.
- रिपोर्ट्सनुसार, सुप्रियाच्या स्टार्टअपने 50 कोटींचा पल्ला गाठला होता.

पुढील स्लाइड्स क्लिक करून पाहा, बिझनेस गर्लचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...