आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Enters Inner Sanctum Of The Trimbakeshwar Temple

त्र्यंबकेश्वर : प्रथमच महिला गाभाऱ्यात, चारशे वर्षांनंतर एेतिहासिक परिवर्तन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभऱ्यात सुमारे ३०० ते ४०० वर्षांनंतर प्रथमच गुरुवारी महिलांना प्रवेश मिळाला. सकाळी ६.०५ वाजता पाेलिस संरक्षणात स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा वनिता गुट्टे यांच्यासह दाेन महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेतले.
गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मंदिराच्या पूर्व दरवाजातून वनिता गुट्टे व त्यांच्या पाच सहकारी महिला रांगेतून प्रवेश करत्या झाल्या. त्यांच्या पुढे व मागे साध्या वेशात महिला पोलिस होत्या. दहा मिनिटे अगोदरच या महिला पोहाेचल्याने त्यांना भाविकांच्या रांगेत उभे ठेवण्यात आले. त्यांनी सुती व ओल्या साड्या परिधान केलेल्या होत्या. त्यांना अडथळा येऊ नये म्हणून गाभाऱ्यात पिंडीजवळ एकही पुरोहित वा भाविकास जाऊ दिले नाही. दरम्यान, बुधवारी संघटनेच्या महिलांनी मारहाण करणाऱ्या देवस्थानाशी संबंधित व्यक्ती व इतर १५० जणांवर गुन्हे दाखल केले हाेते. या कारवाईसह महिलांच्या गर्भगृहात प्रवेशाच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील व्यावसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवली.

महिलांच्या प्रवेशावेळी गर्भगृहाच्या दरवाजाजवळ पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते, सहाय्यक आयुक्त डाॅ. प्रवीण मुंडे, पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, तहसीलदार नरेंद्र बहिरम, निवासी नायब तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने बंदोबस्त तैनात होता. सहा वाजून तीन मिनिटांनी वनिता गुट्टे यांच्यासह मयुरी व एक कार्यकर्ती या तिघींनी गर्भगृहात प्रवेश केल्यावर जमिनीवर बसून पिंडीस नमस्कार केला. दोन मिनिटांत गर्भगृह सोडल्यावर उपस्थितांचा तणाव कमी झाला. यावेळी देवस्थान व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश मिळविण्यासाठी स्वराज्य महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दि. १३, १९, २० व २१ एप्रिल अशा चार वेळा प्रयत्न केला. मात्र, गुरुवारचा प्रयत्न पोलिसांच्या सहकार्याने यशस्वी झाला.

महिलांच्या हक्कासाठी लढा
आम्ही जिंकलो किंवा हरलो असा कोणताही प्रश्न ठेवून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात गेलो नाही. तर स्त्री-पुरुष समान असल्याचे दर्शविण्यासाठी व महिलांच्या हक्काचा लढा यशस्वी करण्यासाठी हे आंदोलन केल्यावर आज त्यास यश मिळाले. यासाठी पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.
- वनिता गुट्टे, अध्यक्षा, स्वराज्य महिला संघटना

रुढी,परंपरेला विश्वस्त मंडळाने कलंक लावला
मंिदर स्थापनेपासून म्हणजेच सुमारे ३०० ते ४०० वर्षापासून येथे सुरू असलेल्या रुढी पंरपरेला या विश्वस्त मंडळाच्या कारकिर्दीत कलंक लागला अाहे. त्यांनी महिला प्रवेशाबाबत न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे हाेेते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे विश्वस्त मंडळाने नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा.
- अंनत जाेशी, अध्यक्ष अखिल भारतीय पुराेहित महासंघ
पुढे वाचा, रुग्णवाहिकेस नाही मुख्यमंत्र्यांना बोलवा- महिला संघटनेची दादागिरी ...