आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेने बलात्काराविरोधात उठवला आवाज, फेसबुकवरच मग तिच्यासोबत घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिताली मुंबईत राहणारी आहे. - Divya Marathi
मिताली मुंबईत राहणारी आहे.
मुंबई- फेसबुकवर बलात्काराविरोधात आवाज उठविणाऱ्या एका महिलेला 2 युवकांनी धमकाविल्याचा आणि अपशब्द वापरल्याचा प्रकार घडला आहे. हे 2 युवक बलात्कार आणि महिलांचे लैगिक शोषण या विषयावर विनोद करत होते. त्याला या महिलेने विरोध केला. त्यानंतर तिला धमक्या येऊ लागल्याने तिने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. मुंबई पोलिसांचा सायबर सेल या घटनेचा तपास करत आहे. 
 
काय आहे महिलेचा आरोप
- सोशल मीडियावर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात #MeToo हे अभियान चालविण्यात आले आहे.
- जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यात येत आहे. एका अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात 15 लाख लोकांनी या हॅशटॅगचा वापर केला. 
- याबाबत मुंबईत राहणाऱ्या मिताली  श्रीवास्तव हाँग यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकली होती. याची अटल बिहारी बड्डर आणि अल्पेश रावल यांनी खिल्ली उडवली. 
- मितालीने त्याच्या महिलांबद्दलच्या आपत्तीजनक टिप्पणींना विरोध केल्यावर तिला त्यांनी अपशब्द वापरले. तिचे समर्थन करणाऱ्या महिलांनाही याचा सामना करावा लागला. 
 
पोलिसांनी दोघांना पाठवले समन्स
- मितालीने न घाबरता त्यांना उत्तर दिले. त्यानंतर तिने सायबर सेलमध्ये जाऊन याबाबत तक्रार केली. 
- पोलिसांनी दोन्ही आरोपींना समन्स पाठवले असून  त्यांना जबाब घेण्यास बोलवले आहे.
- फेसबुकवर मितालीने लिहिले आहे की, या दोघांनी आपल्याला आणि माझ्या समर्थकांना अपशब्द वापरले. आमचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. आमच्या वैयक्तिक जीवनावरही अश्लील टिप्पणी केली. हे सगळे खूपच असह्ह्य झाल्यावर मी तक्रार केली. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...