आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थांबत नाही आहे महिलांची वेणी कापण्याची मालिका, मुंबईत एका आठवड्यात चौथी घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महिलांची वेणी कापण्याची मालिका राजस्थानातील एका गावातून सुरु होऊन मुंबईपर्यंत पोहोचली आहे. हरियाणासह उत्तर प्रदेश आणि दिल्लीतही महिलांची वेणी कापण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.

ठाण्यातील भिवंडीत एका आठवड्यात चार महिलांची वेणी कापण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आहे. पीडित महिलांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पो‍लिसांत तक्रार नोंदवली आहे.

देशभरात शंभरपेक्षा जास्त घटना...
- राजस्थानसह उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रात महिलांची वेणी कापल्याच्या आतापर्यंत शंभरहून जास्त घटना घडल्या आहेत.
- भिवंडीतील कासार अली गावात पाच दिवसांपूर्वी नणंद-भावजाईची वेणी कापल्याची घटना घडली होती.
- ठाकरे पाडा भागातही एका अज्ञात व्यक्तीकडून महिलेची वेणी कापण्यात आली होती.
- भिवंडीतील आमपाडा भागात रविवारी (13 ऑगस्ट) रात्री सायराबानौ सैयद (40) नामक महिलेची वेणी कापण्यात आली होती.
- सायराबानो घरात झोपल्या होत्या. अचानक त्यांना डोक्यात खाज सुटली. झोपेतून जागे होऊन पाहिले असता त्यांची वेणी कापलेली होती.
- दरम्यान, 14 वर्षीय साबिना खातून नामक मुलीची वेणी कापण्यात आली होती.  
- साबिना ही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. ती मुंबईत बहिणीच्या घरी आली होती.
- ठाण्यातील भिवंडीत एका आठवड्यात चार महिलांची वेणी कापण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आहे.
- ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
- अफवा पसरवणार्‍यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...