आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळक्याने रस्त्यातच तरुणीला केले अर्धनग्न; महिलांवर अत्याचार सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत एका तरुणीचा टोळक्याने भररस्त्यात पहिल्यांदा विनयभंग करून तिला अर्धनग्न केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी फय्याज खान, सरोज खान आणि नौशाद खान यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणी ही आपल्या मित्रासोबत रिक्षातून सोमवारी जात होती.

हिंदुस्तान नाका येथे रिक्षा थांबवल्यानंतर त्यांच्याकडे भाडे देण्यासाठी पुरसे पैसे नव्हते. त्यामुळे तरुणीचा मित्र जवळच राहणार्‍या आपल्या नातेवाइकाकडे पैसे आण्यासाठी गेला. या वेळी तरुणी एकटीच रिक्षात होती. काही वेळ झाल्यानंतरही मित्र न आल्याने ती त्याला शोधण्यासाठी जात होती. मात्र, रिक्षाचालकाने ‘आधी पैसे द्या, नंतरच जा’ असे म्हणत तिच्याशी भांडण्यास सुरुवात केली. या वेळी आवाज ऐकून काही जणांच्या टोळक्याने रिक्षाचालकाला पैसे देऊन तरुणीला खाली उतरवून घेतले. त्यानंतर त्यांनी रस्त्यातच तिची छेड काढणे सुरू केले. तरुणीने विरोध करताच त्यांनी तिचे कपडे फाडून तिला अर्धनग्न केले.

त्यामुळे भेदरलेली तरुणी जवळच असलेल्या एका हॉटेलात गेली. तिथेही मालकाने तिला बाहेर काढले. बाहेर येताच पुन्हा टोळक्याने तिची छेड काढणे सुरूच ठेवले. या वेळी रस्त्यावरून जाणार्‍या बीट मार्शलने टोळक्याच्या तावडीतून तिची सुटका केली.