आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराचे दुसर्‍या तरुणीसोबत अफेअर, प्रेयसीने पूलावरून उडी घेवून दिला जीव; आत्महत्येपूर्वी केला कॉल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई (ठाणे)- नवी मुंबईतील वाशी पूलावरून उडी घेऊन एका बीपीओ प्रोफेशनल तरुणीने शनिवारी (5 ऑगस्ट) आत्महत्या केली. आज (मंगळवारी) तिचा मृतदेह सापडला. प्रियकराने फसवणूक केल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.

प्रियकराचे दुसर्‍या तरुणीसोबत अफेअर, डिप्रेशनमध्ये होती तरुणी...
 - नवी मुंबई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेरोन ऐरोली इस्तिथ (22, रा. कुलाबा) हिने शनिवारी सायंकाळी वाशी पूलावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
- एका मोठ्या आयटी कंपनीत ती जॉब करत होती. शेरोनचे ऑफिसमधील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
- शेरोनच्या एका मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, प्रियकराने तिची फसवणूक केली होती. त्याचे दुसर्‍या तरुणीसोबतही अफेअर सुरु होते. याबाबत शेरोनला समजले होते. ती हा धक्का सहन करू शकली नाही. तिने आत्महत्या करून स्वत:ला संपवले.

आत्महत्या करण्‍यापूर्वी प्रियकराला केला होता फोन...
- पोलिस चौकशीत हेही समोर आले आहे की, शेरोन हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या प्रियकराला फोन केला होता. ती आत्महत्या का करत आहे? याचेही कारण सांगितले होते.
- विशेष म्हणजे प्रियकरानेच पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यानंतर शेरोन हिच्या मृतदेहाचा शोध सुरु करण्‍यात आला होता.
- शेरोन बदलापूर येथे आई-वडिलांसोबत राहात होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...