आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला उद्योजकांची शनिवारी राष्‍ट्रीय परिषदेचा आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्‍ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास असोसिएशन, लघु व मध्यम उद्योग विकास चेंबर ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (31 ऑगस्ट) मुंबईतील हॉटेल सॉफिटेल येथे महिला उद्योजकांची राष्‍ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या कार्यक्रमात उद्योग आणि व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणा-या यशस्वी महिलांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.


नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्टÑ औद्योगिक आणि आर्थिक विकास असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, बँक ऑफ इंडियाच्या सीएमडी व्ही.आर. अय्यर आदी मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी होऊ इच्छिणा-यांनी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 022- 61509800/ 6667 4444 या क्रमांकावर किंवा mieda@vsnl.net व iitcindia@vsnl.net या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेच्या आयोजिका साक्षी कुलकर्णी यांनी केले आहे.