आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराच्या खटल्यांसाठी महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उच्च न्यायालयात अपिलासाठी येणा-या बलात्कार प्रकरणांच्या सुनावणीसाठी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी महिला न्यायमूर्तींच्या विशेष खंडपीठाची नियुक्ती केली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांत पुराव्यांअभावी निर्दोष सुटणा -या आरोपींविरुद्धच्या अपिलांची सुनावणी त्यांच्यासमोर होईल.

न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरामानी व न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर या अपिलांची सुनावणी होईल. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो’च्या अहवालानुसार 2007 ते 2011 या काळात मुंबईतील विविध न्यायालयांसमोर बलात्काराच्या 930 खटल्यांची सुनावणी झाली. त्यापैकी केवळ 169 प्रकरणांत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. 308 प्रकरणांत आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. 70 टक्के प्रकरणांत खटल्यांदरम्यान आरोपींचा मृत्यू झाल्याने अथवा फरार असल्यामुळे सुनावणी बंद करावी लागली. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्ते व महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे. खंडपीठासमोर महिला अत्याचारांचीच प्रकरणे सुनावणीसाठी येतील.