आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारला राज्यभरातून पाठवले सॅनिटरी नॅपकीन्स; GST मधून न वगळल्याने निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / औरंगाबाद / नाशिक / पुणे - देशभर एक राष्ट्र एकच कर या हेतूने 1 जुलैपासून लागू होणाऱ्या GST अर्थात वस्तू आणि सेवा करातून सरकारने सॅनिटरी नॅपकीन्स वगळलेले नाही. त्याचाच राष्ट्रवादी महिला आघाडीने तीव्र निषेध केला. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सदस्यांनी नाशिक, औरंगाबाद, जालना, पुणे, लातूर, वसई विरार आणि भिवंडी पोस्टसह विविध ठिकाणांहून केंद्र सरकारला सॅनिटरी पॅड्स कुरिअर करून पाठवेल आहेत. 
 
सॅनिटरी पॅड्स ही महिलांची मूलभूत गरज असून काही चैनीची वस्तू नाही. तरीही सरकारने याला जीएसटीमधून का वगळले नाही असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...