आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत महाराष्ट्राच्या महिला POLITICIANS, काहींकडे राजकीय वारसा, तर काही अ‍ॅक्ट्रेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. आघाडी आणि युती यांचे रखडलेले जागावाटप लवकरच पूर्ण होईल किंवा ते स्वबळाचा पर्याय स्विकारतील. मात्र, नेत्यांच्या गर्दीत काही महिला नेत्या अशाही आहेत ज्या स्वकतृत्वाने आणि ग्लॅमरने आपली छाप सोडतात. तर, काही महिला नेत्या, या त्यांच्या राजकीय वारशामुळे चर्चेत आहेत. राजकारण कोणासाठी वर्ज नाही, त्यामुळे काही अभिनेत्रीही आपली भडक प्रतिमा बाजूला ठेवून राजकारणात आल्या आहेत. अभिनेत्रींच्या उपस्थितीने सभांना गर्दी होते आणि माध्यमांचाही फोकस राहातो, याचा फायदा येणार्‍या काळात राजकीय पक्ष घेताना आपल्याला दिसणार आहेत. divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी नवीन सिरीज घेऊन आले आहे. 'Political Fever@ महाराष्ट्र' यात आम्ही महाराष्ट्रातील महिला नेत्यांची माहिती करुन देणार आहोत.
नवनीत कौर - राणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या नवनीत कौर - राणा या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेल्या महिला नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढविली होती. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला टक्कर दिली होती. यात त्यांचा पराभव झाला. मात्र, त्यांच्या उमेदवारीपासूनच त्या राज्यात चर्चेत होत्या. पूर्वाश्रमीच्या चित्रपट अभिनेत्री असलेल्या नवनीत कौर यांचा राजकारणातील प्रवेश हा लग्नानंतरचा आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे त्यांचे पती.
चित्रपटांतून करिअरला सुरवात
नवनीत कौर यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला तेलगु चित्रपटातून सुरवात झाली. त्या मुळच्या पंजाबी आहेत. त्यांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते. 12 वी नंतर नवनीत यांनी शिक्षण सोडले आणि मॉडेलिंगकडे वळल्या. यादरम्यान त्यांनी सहा म्यूझीक अल्बममध्ये काम केले. त्यानंतर त्यांना 'दर्शन' या कन्नड चित्रपटाची ऑफर आली आणि त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात झाली. याशिवाय त्यांनी तेलगूमध्ये सीनू, वसंथी आणि लक्ष्मी या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 2005 मध्ये तेलगू चित्रपट चेतना, जग्पथी आणि गुड बॉय या चित्रपटांमध्ये त्या मुख्य भूमिकेत होत्या. 2008 मध्ये प्रदर्शित 'भूमी' मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. रिअलिटी शो हुम्मा-हुम्मा मध्ये त्या स्पर्धक म्हणून सहभागी होत्या. त्यांनी मल्याळी आणि पंजाबी भाषेतील लड गये पेंच या चित्रपटात देखील काम केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर महिला नेत्यांविषयी