आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुमन प्राइडच्या विजेत्यांचा गुल पनागच्या हस्ते गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: वुमन प्राइड पुरस्कार विजेत्या दर्शिता (डावीकडे) परीक्षक, अभिनेत्री गुल पनाग, पुरस्कार विजेत्या नंदिनी अयोध्या कुमारी (उजवीकडे))

मुंबई- धाडसाचे अनाेखे उदाहरण ठरलेल्या हजारीबागच्या नंदिनी, जोधपूरच्या अयोध्या कुमारी अहमदाबादच्या दर्शिता यांना गुुरुवारी मुंबईत dainikbhaskar.com वुमन प्राइड अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. अभिनेत्री परीक्षक गुल पनागने या तिन्ही विजेत्या महिलांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवले.

या महिलांची निवड तीन सदस्यीय परीक्षक मंडळाने केली. त्यात गुल पनाग लेखिका शोभा डे अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा समावेश होता. या वेळी गुल पनाग म्हणाली,"भास्कर समूहाच्या वुमन प्राइड अवॉर्डसोबत जोडली गेल्याने मला माझा गौरव झाल्यासारखे वाटत आहे. काही तरी करून दाखवण्याच्या या महिलांचा संघर्ष धाडस जिद्दीला मी सलाम करते.' महिलांच्या धाडसाची कथा वाचा dainikbhaskar.com वर.

महिलांचे कर्तृत्व
>झारखंडमधील हजारीबागच्या नंदिनी चक्रवर्ती या कार पूल ड्रायव्हर आहेत. नंदिनी त्यांच्या व्हॅनमधून गरीब मुलांना शाळेत नेऊन सोडतात. त्या अशा मुलांना शिकवतात देखील.

> लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या राजस्थानच्या जोधपूर येथील अयोध्या कुमारी गौर यांनी आता स्वत:ची शाळा सुरू केली आहे त्या गरीब मुलांना मोफत शिक्षण देत आहेत.

> अहमदाबादच्या दर्शिता स्वत: अपंग आहेत. परंतु इतर अपंगांना रोजगारासाठी त्या मदत करतात. मोफत उपकरण साहित्याची व्यवस्था त्या करतात. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करतात.
बातम्या आणखी आहेत...