आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात कालीका देवीच्या दर्शनाला आलेल्या महिलेवर बलात्कार; नवरात्रीत घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देवदर्शनासाठी नाशकात आलेल्या उल्हासनगर येथील राहाणार्‍या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संदीप हॉटेलमध्ये 22 सप्टेंबरला ही घटना घडली होती.

नवरात्रीमध्ये नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालीका देवीच्या दर्शन घेऊन पीडिता हॉटेलमध्ये थांबली होती. दुसर्‍या दिवशी शिर्डीला जाणार होती. परंतु रुममध्ये घुसून नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
 
काय आहे प्रकरण...?
- पीडिता उल्लासनगर येथील राहाणारी आहे.
- नवरात्रोत्सवानिमित्त ती नाशिकचे ग्रामदैवत कालीका देवीच्या दर्शनाला आली होती.
- रात्री उशीर झाल्याने ती मुंबई नाक्याच्या संदीप हॉटेलमध्ये मुक्कामी थांबली होती.
- मात्र, मध्यरात्री दीडच्या सुमारास एका अज्ञात व्यक्ती तिच्या खोलीत घुसला आणि महिलेच्या 8 महिन्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पीडित महिलेने  पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
- या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. - पीडिता मुक्कामी होती त्या दिवशी हॉटेलमध्ये उपस्थित असणारे ग्राहक आणि कर्मचार्‍यांची चौकशी सुरु आहे.

संंबंधित घटनेचे फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...
बातम्या आणखी आहेत...