आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंटणखान्यातून सुटका झालेल्या मुलीचे पंतप्रधानांना पत्र, सांगितली ही दु:खदायक कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक पत्र आणि राखी लक्ष्मीने पंतप्रधानांना पाठवली. - Divya Marathi
एक पत्र आणि राखी लक्ष्मीने पंतप्रधानांना पाठवली.
मुंबई - शहराचा फेमस रेडलाइट एरिया 'कामठीपुरा'तून सुटका झालेल्या एका 24 वर्षीय तरुणीने पीएम नरेंद्र मोदींना तिच्या दु:खाची कहाणी आणि राखी चिठ्ठीद्वारे पाठवली आहे. पत्रात पंतप्रधान मोदींना 'भाई' (भाऊ) संबोधून कामठीपुऱ्यात राहणाऱ्या महिलांना लवकरात लवकर मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. 
 
कोलकात्याहून मुंबईत आणून विकले होते...
- कोलकाताच्या एका छोट्या गावात राहणारी लक्ष्मी (बदललेले नाव) 6 वर्षांपूर्वी मानवी तस्करीचा बळी ठरली. तिला मुंबईच्या ग्रँट रोडवरील कामठीपुरा रेडलाइट एरियात विकण्यात आले.
- तिला नोकरी देण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडने मुंबईत आणले होते. सुरुवातीला लक्ष्मीने देहव्यापाराला नकार दिला, पण तिला तब्बल एक आठवडा दोरीने बांधून अंधाऱ्या खोलीत उपाशी ठेवण्यात आले. 
- यानंतर तिला अंमली पदार्थांचे आणि वय वाढवण्याचे इंजेक्शन देण्यात आले. तिच्यावर अनेक वेळा रेप करण्यात आला. लक्ष्मीच्या मते, तिला 6 वर्षांपर्यंत एका कोठ्यावर कैद करून ठेवलेले होते. तिला जनावरांसारखी मारहाण होत होती.
 
आजही अनेक मुली कैदेत आहेत...
- लक्ष्मी म्हणाली, मुंबई अनेक कोठ्यांमध्ये 120 हून जास्त मुली कैदेत आहेत.
- तिला फक्त 60 हजारांसाठी विकण्यात आले होते. पण 6 वर्षांपर्यंत पैसे देऊनही तिथून जाऊ दिले नाही.
- ती म्हणाली, तिथे दरवाजे नेहमी उघडेच राहतात, पण तिथून पळून जाणे सोपे नसते. बऱ्याचदा पळताना पकडल्यावर मुलींना खूप मारहाण होते, मारून मारून त्यांचे डोकेही फोडले जाते.
अशी स्वतंत्र झाली लक्ष्मी
- अनेक वर्षे या यातना सहन केल्यावर काही दिवसांपूर्वी एक ग्राहक लक्ष्मीसाठी देव बनून आला.
- लक्ष्मीने तिची आपबीती त्याला सांगितली. ग्राहकाने मुंबईच्या एका एनजीओ 'INTERNATIONAL JUSTICE MISSION'ला संपर्क केला.
- यानंतर एनजीओने पोलिसांच्या मदतीने त्या कोठ्यावर धाड टाकली जिथे लक्ष्मी कैदेत होती.
- यानंतर लक्ष्मीची सुटका करून तिला एका गारमेंट कंपनीत काम देण्यात आले. मोकळा श्वास मिळालेली लक्ष्मी खूप खुश आहे. तिला वाटते की कामठीपुऱ्यातून इतर मुलींनाही मुक्त करायला हवे.
 
पंतप्रधानांना बांधली लक्ष्मीची राखी
- लक्ष्मीचे पत्र आणि राखी घेऊन महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर पीएम नरेंद्र मोदींना भेटल्या.
- त्यांनी लक्ष्मीची राखी आणि पत्र दोन्ही पंतप्रधानांच्या सुपूर्द केले. रहाटकर म्हणाल्या, पंतप्रधानांनी लक्ष्मीची राखी आपल्या हातावर बांधली.
लक्ष्मीने दोन पानांच्या या भावुक पत्रात मोदींना 'भाई' (भाऊ) संबोधित केले.
 
आपल्या पत्रात लक्ष्मी लिहिते...
'मेरे प्रिय भाई,
मी मुंबईतील लक्ष्मी आहे. माझा संदेश विजयाताईंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय याचा मला खूप आनंद झालाय. अतिशय कठीण परिस्थितीतून मला वाचवल्याबद्दल मी तुमची आणि सरकारची आभारी आहे. मी 6 वर्षांपासून मानवी तस्करीचा बळी ठरले होते, एका वेश्यालयात मला विकण्यात आले होते अन् माझे जीवन नरक झाले होते. मला मारहाण व्हायची, एखाद्या जनावरासारखा व्यवहार माझ्याशी केला जायचा. मला वाटायचे की यातच माझा मृत्यू होईल.
- पुढे आपल्या सुटकेची कहाणी लिहून लक्ष्मीने लिहिले की, एक दिवस मुंबई पोलिस आणि आयजेएम संघटनेने मला त्या काळोखातून वाचवले. मला नवे जीवन दिले. आज मी स्वतंत्र जीवन जगत असून एका कापड कारखान्यात काम करत आहे. मी सन्मानानचे जीवन जगत आहे. माझी मदत केल्याबद्दल मी सरकार, पोलिस आणि आयजेएमची खूप आभारी आहे.
- इतर मुलींची सुटका करण्याचे आवाहन करत लक्ष्मीने लिहिले की, रक्षाबंधनच्या या दिवशी मी तुम्हाला विनंती करते की, माझ्यासारख्या इतर मुलींचीही मदत करा, ज्या आजही वेश्यालयात अडकून पडलेल्या आहेत. या मुलींना दमदाटीने ठेवले जाते. महिलांशी पुरुषांच्या तुलनेत खूप वाईट व्यवहार केला जातो. या सर्व महिलांचे तुम्ही भाऊ आहात आणि माझी तुम्हाला विनंती आहे की, या सर्व बहिणींचे रक्षण करा. मी तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करते.
'रक्षाबंधनच्या शुभेच्छा!'
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...