आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाला असा सोबत घेऊन गेला मृत्यू, अशी झाली दोघांची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा पुरी यांचा फाइल फोटो. (इन्सॅटमध्ये कॅमेऱ्यात कैद झालेली दुर्घटना) - Divya Marathi
शिल्पा पुरी यांचा फाइल फोटो. (इन्सॅटमध्ये कॅमेऱ्यात कैद झालेली दुर्घटना)
मुंबई- नवी मुंबईत एका दुचाकीस्वार महिलेचा अपघातात मृत्यू झाला. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात महिलेच्या अंगावरुन एक क्रेन गेल्याचे दिसत आहे. ही महिला ऑफिसहून घरी परतत होती. त्याचवेळी तिची दुचाकी रस्त्यावरुन घसरली. त्यानंतर मागून आलेल्या क्रेनने तिने चिरडले. अपघातानंतर तिथून पळून जाणाऱ्या क्रेन ड्रायव्हरला लोकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. 
 
असा झाला अपघात
- नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात खारघर येथील उत्सव चौकाजवळ झाला. ही घटना तेथील चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
- या अपघातात खारघरमध्ये राहणाऱ्या शिल्पा पुरी यांचा मृत्यू झाला. शिल्पा एका मोठया कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत होती.
- शनिवारी संध्याकाळी शिल्पा दुचाकीवरुन आपल्या घरी परतत होती. त्याचवेळी उत्सव चौकात तिची दुचाकी घसरली आणि ती रस्त्यावर पडली.
- शिल्पा रस्त्यावर पडताच तिच्या मागून येणाऱ्या क्रेनने तिला चिरडले. क्रेनचे दोन्ही टायर तिच्या अंगावरुन गेले. शिल्पाने जागेवरच प्राण सोडले. 
 
फरार झालेल्या ड्रायव्हरला लोकांनी पकडले
- या घटनेनंतर क्रेनचालक थांबण्याऐवजी पळून गेला. काही स्थानिक नागरिकांनी पाठलाग करुन त्याला पकडले.
- वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप काळे यांनी सांगितले की, तपासानंतर निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या क्रेनचालकाला अटक करण्यात आली. ही गोष्ट नाकारता येणार नाही की रस्त्यावर असणाऱ्या पॅचमुळे दुचाकी घसरली आणि क्रेन त्यांच्या अंगावरुन गेली. 
- घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस विनय मोरे यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की, या घटनेसाठी जितका ड्रायव्हर जबाबदार आहे. तितकीच नगरपालिका आणि रस्ता बनवणारा कॉन्ट्रेक्टरही जबाबदार आहे.
- या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.  
 
नागरिकांनी नाही केली मदत
- या अपघातानंतर शिल्पा खूप वेळ रस्त्यावरच पडलेली होती. पण लोकांनी तिची मदत केली नाही. एकही वाहन तिच्याजवळ थांबले नाही. 
- काही सेकंदातच तिथून 30 वाहने गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. पण कोणीही तिथे थांबले सुध्दा नाही. थोड्या वेळाने कोणीतरी पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी ही माहिती तिच्या घरी कळवली. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...