आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Suicide At Mumbai Cst Railway Station Tiolet

मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकातील शौचालयात पेटवून घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा अधिकारी इमारतीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. अनिता पटेल असे या महिलेचे नाव असून आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या महिलेने स्वतः जाळून घेऊन आत्महत्या का केली याची माहिती पोलिस आता घेत आहे.
सीएसटी स्थानकावर रेल्वे सुरक्षा कार्यालयाच्या जवळ असलेल्या शौचालयातून अचानक आगीच्या ज्वाला व धूर दिसू लागला. त्यावेळी तेथील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी जावून महिलेच्या अंगावर पाणी टाकले पण तोपर्यंत ती संपूर्ण जळाली होती. तिला दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी हत्या तसेच आत्महत्या या दोन्ही बाबी पडताळून पाहत आहेत.