आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत महिलेची वेणी कापल्याची घटना; आतापर्यंत 5 घटना घडल्याने भीतीचे वातावरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भिवंडीत एका महिलेची वेणी कापल्याची घटना उघडकीस आली आहे. फातमा शाह (24) असे वेणी कापलेल्या महिलेचे नाव आहे. त्यामुळे महिलांच्या वेण्या कापण्याचे सत्र सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
भिवंडीत वेगवेगळ्या घटनेत 5 महिलांच्या वेण्या कापल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भिवंडीतली वेणी कापल्याची ही 8 दिवसांतली पाचवी घटना आहे.
 
भिवंडीच्या न्यू आझाद नगर मधील 24 वर्षीय फातमा शाह या सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरातील किचनमध्ये जेवण बनवत होत्या. फातमा यांना आपल्या डोक्यावरील केस जड झाल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी केसांना हात लावला असता फातिमा यांची वेणी खाली पडली. या घटनेमुळे फातमा यांना मानसिक धक्का बसला आहे.
बातम्या आणखी आहेत...