आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोवीसवर्षीय महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, एसीपीविरोधात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- चोवीसवर्षीय महिला पोलिसाने  पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील कळवा येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी सहपोलिस आयुक्तासह एका पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभद्रा पवार असे मृत  महिला पोलिसाचे नाव आहे. सुभद्रा ही आपल्या तीन सहकारी महिलांसोबत भाड्याने खोली घेऊन राहत होती. तिचे आपल्याच विभागातील एका पोलिसाशी प्रेमसंबंध होते. गुरुवारी सकाळी हा पोलिस सुभद्राला भेटण्यासाठी आला होता. मात्र, काही वेळानंतर तो  बाहेर गेला. त्यानंतर काही वेळाने तो परत खोलीवर आला असता त्याला सुभद्राने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसासह सहपोलिस आयुक्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सुभद्राने आत्महत्या का  केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...