आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी मंडळाची; मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गणेशोत्सव काळात दर्शनासाठी येणाºया महिलांशी कसलेही गैरवर्तन झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मंडळाची असेल. कोणत्याही मंडळाने ही जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा दाखवल्यास भविष्यात त्यांना गणपती बसवण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंह यांच्या उपस्थितीत पश्चिम उपनगरातील गणेश मंडळांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी गणेशोत्सवासाठी मंडळांनी केलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. तसेच मंडळांना काही सूचनाही केल्या. गणपती दर्शनासाठी येणाºया महिलांची छेडछाड होऊ नये, चेन स्नॅचिंगचे प्रकार होऊ नयेत म्हणून मंडळांनी जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी. ही मंडळांची प्राथमिक जबाबदारी असेल. त्यावरच पुढील वर्षी एखाद्या मंडळाला परवानगी द्यावी की नाही हे ठरवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मंडळांच्या प्रतिनिधींनीही शिस्तबद्ध उत्सव साजरा करण्याचे आश्वासन त्यांना दिले.