आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदू मिलचे दार अखेर उघडले, मुख्यमंत्र्यांचे सचिव दराडे यांची शिष्टाई फळास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जमिनीची भरपाई िमळेपर्यंत दादर येथील इंदू मिलमध्ये डाॅ. आंबेडकर स्मारकाचे काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेत राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने (एनटीसी) िमलचे बंद केलेले दरवाजे अखेर गुरुवारी उघडले. या कामी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण दराडे यांची शिष्टाई फळास आली असून स्मारकासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीकडून मिलमधील सर्वेक्षणाच्या कामास सुरुवात झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आॅक्टाेबर महिन्यात इंदू िमलमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची कोनशिला बसवण्यात आली होती. तत्पूर्वी एप्रिलमध्ये राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात जमीन हस्तांतरणाचा सामंजस्य करार झाला होता. त्याला खुद्द पंतप्रधान मोदी अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, वस्त्रोद्योग मंडळाने मिलच्या साडेबारा एकर जमिनीचा मोबदला िमळेपर्यंत मिलमध्ये काम सुरू करण्यासाठी प्रवेशास स्पष्ट नकार िदला होता. तसेच मिलबाहेर सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा ठेवला होता. त्यामुळे आराखडा तयार असतानाही गेले वर्षभर स्मारकाचे काम पुढे जाऊ शकले नव्हते. मिलच्या जमिनीची भरपाई निश्चित करण्याबाबत समिती नेमण्यात आली होती. िमलच्या जमिनीच्या भरपाईबाबतही वस्त्रोद्योग महामंडळ अाणि राज्य सरकारमध्ये मतभेद होते.

मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण दराडे यांनी स्मारकाच्या प्रश्नी स्वत: लक्ष घातले. तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाशी बोलणी चालू केली. अखेर वस्त्रोद्योग महामंडळाने मिलचे दरवाजे गुरुवारी उघडून िदले. ‘आज आमच्या इंिजनिअर्सना मिलमध्ये प्रवेश िमळाला आहे, सर्वेक्षणाचे काम चालू करण्यात आले आहे. मिलमधील झाडांची आणि इतर वस्तूंची गणती करण्यात येत आहे. जिआॅलाॅजिकल सर्वेक्षणाचे काम करणे चालू आहे’, अशी माहिती प्रकल्पाचे सल्लागार शशी प्रभू यांनी दिली.

ठपका पुसण्याचा प्रयत्न
सन २०११ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पाच डिसेंबर रोजी इंदू िमलची जमीन आंबेडकर स्मारकासाठी देण्याची लोकसभेत घोषणा झाली हाेती; परंतु येनकेन प्रकारे गेली पाच वर्षे स्मारकाचे काम रखडले होते. सध्या दादरच्या आंबेडकर भवन पाडकामाविषयी वाद चालू आहे. फडणवीस सरकारने भवन पाडण्यास मदत केल्याचाही आरोप अांबेडकर चळवळीतील नेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर इंदू िमलमधील स्मारकाचे काम मार्गी लावण्याचा निर्णय फडणवीस सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार अाहे.
प्रकल्प अहवाल लवकरच
कंपनीकडून या स्मारकाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यास मुंबई महानगर प्रदेश िवकास प्राधिकरणाची मंजुरी िमळाली की स्मारकाच्या बांधकामाच्या िनविदा काढण्यात येणार आहेत. साधारणत: जानेवारी महिन्यात स्मारकाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...