आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात आहे जगातील सर्वोत्तम HOTEL, दुबईपासून मॉरिशसपर्यंत आहेत शाखा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईस्थित ओबेरॉय हॉटेल)
मुंबई- भारतातील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल ओबेरॉय याला एक मोठे यश मिळाले आहे. जगभर केलेल्या एका सर्व्हेनुसार ओबेरॉय हॉटेल अँड रिसोर्ट याला जगातील सर्वात उत्कृष्ट हॉटेल अँड रिसॉर्ट्स या श्रेणीत स्थान मिळाले आहे. या सर्वेक्षणमध्ये ओबेरॉयशिवाय अमन रिजॉर्ट, रिट्ज कार्लटन, फोर सीजन्स, रोजवुड, मंडारिन ओरियंटल, रॅफेल्स, सेंट रेजीस आणि शांगरी-ला यांनाही स्थान देण्यात आले आहे.
अनेक देशात ओबेरॉय देतात सेवा-

ओबेरॉय ग्रुप भारतासह रशिया, इंडोनेशिया, मॉरिशस आणि सौदी अरबमध्ये 'ओबेरॉय हॉटेल, रिसोर्ट अँड ट्रायडेंट हिल्टन ब्रॅंड' या नावाने 32 हॉटेल आणि लग्झरी क्रूजर चालवली जातात. याशिवाय हा ग्रुप विमानात केटरिंग सेवा देणे, एयरपोर्ट रेस्टांरंट, ट्रॅव्हल अँड टूर सर्व्हिस, रेंटल कार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट एयर चार्टर आदी क्षेत्रात सक्रिय आहे.

हजारो ग्राहकांकडून केला गेला सर्व्हे-

वर्ल्ड बेस्ट हॉटेल्सचा सर्व्हे हॉटेलांत नियमित जाणा-या जवळपास 21 हजार 783 ग्राहकांकडून आणि 1626 व्यावसायिक ट्रॅव्हल एजंटांच्या अनुभवावर आधारित आहे. जे वर्षाला सुमारे 35 टक्केपेक्षां जास्त हॉटेलात राहतात.

पुढील स्लाईडद्वारे पाहा, ओबेरॉय हॉटेल्सची जगभर परसलेल्या शाखांचे PHOTOS...