आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Class Facility In Mumbai Metro And Metro Station

PHOTOS: मुंबई मेट्रो कशी दिसते आतून, प्रत्येक स्टेशन्सवर आहे वर्ल्ड क्लास सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संपली, अखेर मुंबई मेट्रोची प्रतिक्षा झाली. मुंबई मेट्रो आजपासून 18- 19 तासांसाठी मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर झाली आहे. आज सकाळी पहाटे साडेपाच वाजल्यापासून मुंबईतील चाकरमन्यांनी तुफान गर्दी केली आहे. मात्र, सर्व काही वेळेत व सुरळित सुरु आहे. रविवारी मेट्रो सहा तास धावली त्यात सुमारे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे सांगण्यात येते. एका मेट्रोला चार डब्बे जोडले गेले आहेत. एका वेळेस किमान 1500 प्रवाशी बसून आणि उभा राहून प्रवास करू शकतात. त्यामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा व रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.
ही मेट्रो वर्ल्ड क्लास दर्जाची आहे. यात सर्व मशिन्स व यंत्रे ऑटोमॅटिक व इकोफ्रेंडली आहेत. मुंबई मेट्रोने आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपल्याला टोकन दिले जाईल. जे आत प्रवेश करताना तुम्हाला स्क्रॅच करावे लागेल. त्याचा कालावधी एक तासाचा असेल व जाण्याचे ठिकाण निश्चित असेल. बाहेर पडताना ते टोकन तुम्हाला मशिन्समध्ये टाकावे लागेल तरच तुम्ही ऑटोमॅटिक मशिन्समधून बाहेर पडू शकता. तर पुढे पाहा आपली मुंबई मेट्रो आतून दिसते तरी कशी...