आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीतील बडी कंपनी कॉग्नीझंट हिंजवडीत आणखी गुंतवणूक करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वर्ल्ड एकोनॉमिक्स परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कंपन्यांशी राज्यातील गुंतवणुकीबाबत चर्चा केली. यामध्ये जपानमधील काही कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
जापनीज ट्रेड ऑर्गनाझेशनचे प्रमुख हिरोयुकी ईशिगे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जपानमधील कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. नगर जिल्ह्यातील सुपा येथे जापनीज इनव्हेस्टमेंट पार्क उभारण्याबाबत चर्चा झाली. येथे उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीबाबत जेट-रो या कंपनीला रस असल्याचे त्यांनी सांगितले. जमीन आणि इतर पायाभूत सुविधांबाबत संपूर्ण सहकार्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दिले.
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मित्सुई या कंपनीचे केनीची होरी यांच्याशी चर्चा केली. या कंपनीने उत्पादन ते वित्तीय पुरवठा यामध्ये गुंतवणूकीसाठी रस दाखविला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कॉग्नीझेंट या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपनीचे अध्यक्ष गोर्डन कोबर्न आणि प्रतिनिधींशी चर्चा केली. या कंपनीला पुण्याजवळ हिंजेवाडी येथे आपल्या प्रकल्पासाठी जमीन हवी आहे, राज्य सरकार या कंपनीला इरादापत्र देणार असून कंपनी आपल्या गुंतवणूकीबाबत लवकरच घोषणा करणार आहे. कोबर्न यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांची झालेल्या बैठकीदरम्यान पुण्यातील कुशल कर्मचारी वर्ग आणि राज्य सरकार हाताळत असलेल्या गुंतवणूकीबाबतच्या प्रक्रियेबाबत प्रशंसोद्‌गार काढले.