मुंबई - फिरण्याची, जगातील नावाजलेली स्थळे पाहाण्याची, ट्रेकिंग, समुद्र किनार्यावरील संध्याकाळ अनुभवण्याची कोणाची इच्छा नसते. पर्यटन हा आता प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. वर्षातून एक-दोनदा तरी
आपल्या राहात्या शहर किंवा गावापासून लांब पर्यटनस्थळी सगळे जात असतात. जगात पाहाण्यासारखे खूप ठिकाणे आहेत, मात्र आपल्या महाराष्ट्रातही काही कमी नाही. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन आहे. त्यानिमीत्त आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती देत आहोत.
शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. गड, किल्ले, समुद्र, डोंगर रांगा, त्यातील लेण्या असा महाराष्ट्र समृद्ध आहे. आम्ही येथे महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग किल्ल्याची माहिती देणार आहोत. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, हा किल्ला समुद्रात आहे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.
अरबी समुद्रात किल्ला
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा किल्ला आहे. अरबी समुद्रात हा किल्ला उभा आहे. समुद्राच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला जवळपास 48 एकर परिसरात विस्तारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीची कल्पना हा किल्ला पाहून येते. शत्रू समुद्र मार्गानेही येऊ शकतो हे ओळखून महाराजांनी हा किल्ला बांधला. मराठी सैन्याचे नेव्ही बेस म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला किल्ला
शिवाजी महाराजांनी आरमार उभारताना समुद्रमार्गे शत्रू स्वारी करु शकतो हे ध्यानात घेऊन किल्ल्याची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. येथील कुरटे खडकावर तीन दशकांपासून किल्ल्या उभा आहे. 1664-67 या काळात या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. कुरटे खडकावर हा किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याच्या जागेसाठी महाराजांनी मोठी शोध मोहिम राबवली होती. त्यानंतर कुरटे खडकाची निवड करण्यात आली. इ.स. 1664 साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. या किल्ल्याचे खास वैशिष्टय म्हणजे, पश्चिम आणि दक्षिण तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले गेले होते. या किल्ल्याला जंजिरा हे नाव दिले गेले होते, आज तोच सिंधुदुर्ग किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.
किल्ल्यावर तीन विहीरी
हा किल्ला मराठा वास्तूकलेचा नमुना म्हणून ओळखला जातो. किल्ल्याच्या तटांची उंची 30 फूट आणि रुंदी 12 फूट आहे. तटास भक्कम असे 22 बुरूज आहेत. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय असावी यासाठी तीन विहिरी आहेत. दुध विहीर, साखर विहीर, दही विहीर या त्या तीन विहीरी आहेत.
शंकराच्या रुपातील शिवाजी महाराजांचे मंदीर
राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील एकमेव मंदीर या किल्ल्यावर आहे. त्याची स्थापना राजाराम महाराजांनी केली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जंजिरा - सिंधुदुर्ग किल्ल्याची विलोभनिय छायाचित्र