आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1300 फुटबॉल मैदानांएवढा स्पा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्याला जगातील सर्वात मोठ्या आणि उत्कृष्ट स्पाचा आनंद लुटायचा असेल तर परदेशात जाण्याची गरज नाही. मुंबईहून अडीच तासांवर ही सुविधा व विसावा उपलब्ध आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात उभारल्या जाणार्‍या या स्पा रिट्रीटचे क्षेत्रफळ 320 एकर आहे. म्हणजेच 1300 फुटबॉल मैदानांएवढे.
हिल्टन गु्रपचा हा प्रकल्प सह्याद्रीच्या कुशीत असून सुमारे 3200 एकरांमध्ये निसर्गसौंदर्याची उधळण असलेल्या परिसरात हॉलिडे रिसॉर्ट उभारला जात आहे. येथे मुक्काम करणे खर्चिक वाटत असले तरी रिसॉर्ट उभारणार्‍यांचे म्हणणे आहे की, शौकिनांसाठी ही किंमत काहीच नाही.
येथे एका रात्रीच्या मुक्कामाचे शुल्क 33 हजार रुपये आहे. त्यात जगातील सर्वात चविष्ट जेवण आणि उंची मद्य मिळेल. या प्रकल्पाचे महाव्यवस्थापक अँड्रियास क्रीमर म्हणाले की, आम्ही क्लाएंट्सना जागतिक दर्जाचा अनुभव देऊ इच्छितो. त्यामुळे येथील नॉनव्हेज जेवण परदेशातून मागवले जाईल. येथे येणार्‍यांना आम्ही वारसास्थळांची सफरही घडवून आणणार आहोत कारण जवळच तुंगी, तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले आणि कार्ला व भाजाची बौद्धकालीन लेणी आहेत.