आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील फळबागांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुष्काळात पाणीटंचाईमुळे मराठवाड्यातील फळबागा खाक होत असून मोसंबी आणि डाळिंबांच्या बागा पूर्णपणे नष्ट झाल्या असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. तसेच या फळबागांच्या लागवडीकरिता देण्यात येणारे अनुदान वाढवून देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील दुष्काळ दौ-यानंतर तेथील मोसंबी आणि डाळींबाच्या बागांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. त्यातही औरंगाबाद, जालना, बीड,या जिल्ह्यांमधील मोसंबी आणि डाळींबाच्या बागा पूर्णपणे जळून गेल्या असून सध्या 20 टक्केही पीक हाताशी लागणार नाही, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. दुष्काळामुळे या जळालेल्या फळबागांसाठी सरकारने सरसकट मदतीचे पॅकेज देण्याऐवजी पाच वर्षांखालील फळबागांसाठी वेगळे पॅकेज आणि पाच वर्षांवरील फळबागांसाठी वेगळे पॅकेज देण्यात यावे, असा प्रस्ताव तयार करीत असून 50 हजार प्रतिहेक्टर मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बागा वाचणारच नाहीत
सध्या या फळबागांना टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. पण पाणीच उपलब्ध होत नसल्याने या बागा वाचणारच नाहीत. त्यामुळे नव्याने फळबागा लागवडीसाठीही सरकारने अनुदानात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासाठी सध्या फळबागांसाठी 30 हजार रूपये प्रतिहेक्टर पॅकेज असून यापैकी 50 टक्के अनुदान म्हणजे 15 हजार रूपये दिले जातात. तर 50 टक्क््यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या ठिकाणी 23 हजार रूपये दिले जातात. मात्र, यापुढे प्रतिहेक्टरी 60 हजार रूपयांचे पॅकेज दिल्यास 30 हजार रूपयांचे अनुदान संबंधित शेतक-या ला मिळाल्यास तो टॅकरचा खर्च करू शकेल, असा विश्वास असल्याने हे पॅकेज 60 हजार रूपयांचे करावे, तसेच फळबागांच्या वयाची अटही शिथील करावी,असा प्रस्ताव केद्राकडे पाठवणार असल्याचेही विखे पाटील
यांनी सांगितले. तसेच शेततळ्यांसाठी 100 ऐवजी 40 मायक्रॉनचा पेपर वापरायची परवनागी दिल्याने आता मोठ्या प्रमाणावर या कागदाचा वापर होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.