आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wquaf Board Corruption Very Soon Disclosed Prithiviraj Chavan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वक्फ बोर्डातील भ्रष्टाचारातील चौकशीचा अहवाल महिनाभरात - पृथ्‍वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वक्फ बोर्डातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या शेख समितीचा चौकशी अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.
वक्फ बोर्डाच्या मागील 25 वर्षांच्या कारभाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी सुधाकर देशमुख, देवेंद्र फडणवीस, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, जितेंद्र आव्हाड, बाबा सिद्दीकी, अस्लम शेख आदी आमदारांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आक्षेप सदस्यांनी घेतल्यानंतर ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आली होती. गुरुवारी तिच्यावर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी शेख समितीचा अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आश्वासन दिले.

तारीक अन्वर यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे या अहवालात असल्यामुळेच तो मांडला जात नसल्याचा आरोप खडसे यांनी या वेळी केला. वक्फ बोर्डाच्या कारभाराची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी या वेळी सदस्यांनी केली होती. परंतु, शेख समितीच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर आवश्यकता भासल्यास सीबीआय चौकशीचा निर्णय घेतला जाईल. तसेच, वक्फ बोर्डाचे अधिकारी पठाण यांच्याविरोधातील आरोपांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.