आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशप्रेम काही बॉर्डरवरील घडामोडींत नसतं; भालचंद्र नेमाडे यांचे परखड मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील बालकांना कसं वाढवता, त्यांना खाद्य, शिक्षण, आरोग्याच्या काय सुविधा देता, लोकांना प्रश्न विचारण्यासाठी कसं जागृत करता यामध्ये खरीखुरी राष्ट्रीयता असते. केवळ देशाच्या सीमेवर घडणाऱ्या घडामोडींना राष्ट्रीयतेशी जोडणं मूर्खपणाचं आहे, उपद्रवी लोक अशी राष्ट्रीयता निर्माण करत असतात, असं परखड मत प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं. भारतात सध्या जो राष्ट्रीयतेचा उन्माद वाढतो आहे, त्यास विकासाचं आंतराष्ट्रीय राजकारण, दबाव कारणीभूत असल्याचं सांगत नेमाडे यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर आपल्या तिरकस शैलीत टिप्पणी केली.

साहित्य अकादमीने ‘आदिवासी साहित्य आणि संस्कृती’ यावर शनिवारी मुंबई मराठी ग्रंथ संग्राहलयात परिसंवादाचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनाच्या सत्रात नेमाडे यांचे मुख्य भाषण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

नेमाडे यांनी आपल्या दहा मिनिटांच्या छोटेखानी भाषणात आदिवासींच्या विकासासंदर्भात आपल्या खास नेमाडी शैलीत परखड मते मांडली. राष्ट्रीयतेसाठी दुसऱ्यांनी बलिदान द्यावे, इतरांनी त्याग करावा, अशी इथल्या अभिजन- मध्यमवर्गीयांची धारणा आहे. देशाला अद्याप विकासाचा पाया सापडलेला नाही. म्हणून विकासाचं सध्याचं भांड उपडं केलं पाहिजे, त्यासाठी खालून विद्रोह आला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच विकासाची व्याख्या बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म या खुळचट गोष्टी आहेत.त्यामुळे बहुभाषिकता नष्ट होत आहे. राष्ट्रीयता आतून आली पाहिजे. राष्ट्रीय आकलन केवळ मातृभाषेतून होतं. परक्या भाषेत अर्धवट लोक तयार होतात. सृष्टीचं आकलन मातृभाषेत होतं, परक्या भाषेतलं आकलन अपुरं असतं, असे सांगत आठवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच दिलं पाहिजे, असा मुद्दा नेमाडे यांनी मांडला.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाले भालचंद्र नेमाडे....
बातम्या आणखी आहेत...