आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडू, काेसंबी यांना ‘साहित्य अकादमी’, माझ्या लेखनाची दखल घेतली यात आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / पुणे - लेखक ल.म.कडू यांना ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा  मराठी भाषेसाठी  वर्ष २०१७ चा  ‘बाल साहित्य पुरस्कार’, तर ‘उभं-आडवं’ या कथासंग्रहासाठी राहुल कोसंबी यांना ‘युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी मंडळाने ही घोषणा केली. राष्ट्रीय बालदिनी १४ नोव्हेंबर २०१७ रोजी विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ताम्रपदक आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशातील २४ भाषांमधील लेखक व त्यांच्या कलाकृतींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्काराबद्दल अानंद व्यक्त करून ‘खारीचा वाटा’मधून धरणग्रस्त बालकांवर, त्यांच्या मनस्थितीवर, जगण्यावर होणारा परिणाम टिपण्याचा प्रयत्न केला असल्याचे ल. म. कडू म्हणाले.

माझ्या लेखनाची दखल घेतली यात आनंद : राहुल कोसंबी या युवा लेखकाच्या पहिल्याच लेखनाला साहित्य अकादमीने दाद दिली आहे. कोसंबी यांच्या ‘उभं आडवं’ या वैचारिक लेखसंग्रहाला अकादमीने युवा पुरस्कार जाहीर केला आहे. दिव्य मराठीशी बोलताना कोसंबी म्हणाले, “आज राजकीय परिस्थिती ज्या पद्धतीने वावरत आहे, त्या परिस्थितीत माझ्यासारख्या नव्या लेखकाच्या वैचारिक लेखनाची राष्ट्रीय पातळीवर अशी दखल घेतली गेली, हे विशेष आनंदाचे आहे. अन्य कलांच्या संदर्भात प्रेक्षकांची प्रतिक्रिया कलाकाराला थेट अनुभवता येते. लेखकाचे तसे नसते. वाचक त्याच्या नजरेपार असतो. तरीही या लेखनाचे वाचकांनी स्वागत केले आहे. त्याची दखल घेऊन अकादमीसारख्या दीर्घ परंपरा असणाऱ्या संस्थेने या वैचारिक लेखनाचा गौरव केला, याचा आनंद आहे
बातम्या आणखी आहेत...