आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Writer Shobhaa De Tweet On Marathi Cinema Prime Time

\'फडणवीस सरकार हुकूमशहासारखे वागते,\' शोभा डे यांच्या ट्विटवर सेना-NCP आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्याच्या मुद्यावरुन बॉलिवूड आणि मराठी निर्माते असे दोन गट आधीच निर्माण झाले असताना, प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी फडणवीस सरकार हुकूमशहा असल्याचे ट्विट करुन या वादात उडी घेतली आहे. 'या सरकारने आधी गोवंश हत्या बंदी, आता मराठी सिनेमा, नको नको, ये सब रोको,' असं ट्विट शोभा डे यांनी केले आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे.
राज्यातील मल्टिप्लेक्स मालकांनी प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे सरकारने मंगळवारी बंधनकारक केले. त्यानंतर शोभा डे यांनी फडणवीस सरकारला हुकूमशहा संबोधत ट्विट केले, 'या सरकारने आधी गोवंश हत्या बंदी, आता मराठी सिनेमा, नको नको, ये सब रोको. ज्या महाराष्ट्रावर आम्ही प्रेम करतो, तो हा महाराष्ट्र नाही. माझं मराठी सिनेमांवर प्रेम आहे. ते कुठे आणि कधी पाहावेत हे मला ठरवू द्या. देवेंद्र फडणवीस तुमची दादागिरी नको.'
त्यांच्या या ट्विटने प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखवण्याची घोषणा करणारे राज्याचे सांस्कृतित मंत्री विनोद तावडे किंवा ज्यांचा ट्विट मध्ये उल्लेख आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडण्याऐवजी शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनाचा अधिक मिरच्या झोंबल्या आणि त्यांनी बुधवारी सभागृहात डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला.

या प्रस्तावावर शोभा डे यांनी दुसरे ट्विट केले आहे. त्या म्हणतात, ' माफी मागण्यासाठी हक्क भंगाचा प्रस्ताव आणला? कम ऑन, महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, तसेच माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील.'
प्रताप सरनाईक म्हणाले, की मराठी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी डे यांनी सर्व जनतेची माफी मागावी.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शोभा डे यांचे ट्विट फडणवीस सरकारवरील ट्विट आणि त्यांच्या समर्थनार्थ निखिल वागळे काय म्हणाले