आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्यातनाम नाटककार- लेखक अशोक पाटोळे यांचे मुंबईत निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ख्यातनाम नाटककार, लेखक व रंगकर्मी अशोक पाटोळे (वय 62) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देहदानासाठी त्यांचे पार्थिव जसलोक रुग्णालयातून केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत्यूपूर्वी अशोक पाटोळे यांनी देहदान केले होते. तसेच मृत्यूनंतर आपल्यावर कोणतेही अंत्ससंस्कार केले जावू नयेत अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसारच त्यांना बेळगाव येथे शेवटचा निरोप दिला जाणार आहे.
मी माझ्या मुलांचा, आई रिटायर होतेय अशा ह्रदयस्पर्शी नाटकांचे त्यांनी लेखन केले. त्यानंतर झोपा आता गुपचूप, प्रा. वाल्मिकी रामायण, हीच तर प्रेमाची गंमत आहे यासारख्या विनोदी नाटके त्यांनी लिहली. श्यामची मम्मी, जाऊबाई जोरात, एक चावट संध्याकाळ या गाजलेल्या नाटकांचे लेखन त्यांनी केले.
साहित्यविश्वात प्रसिद्ध असलेले अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. कथाकार, नाटककार म्हणून 1971 मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते.
बातम्या आणखी आहेत...