आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या प्रिस्क्रिप्शनमुळे 30 हजार बळी; अन्न व औषध प्रशासन आयुक्तांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यामुळे राज्यात दरवर्षी 30 हजार रुग्णांचा मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली. त्यामुळेच शासन औषध दुकानात फार्मासिस्ट ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.

झगडे यांचा शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात वार्तालाप आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. शेजारील राज्यातून महाराष्टÑात मोठ्या प्रमाणात गुटखा येत असून याबाबत दक्षता घ्यावी, असे पत्र शेजारील सर्व राज्यांना पाठवले असल्याची माहिती त्यांनी सांगितले. सुरक्षित अन्न व औषधांची मागणी सध्या वाढली आहे. औषध आणि अन्नाच्या गुणवत्तेला आता अधिक महत्त्व आले असून कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे राज्यात यापूर्वी अनेक गैरप्रकार घडले. राज्यातील 2 कोटी लोकांचा उदरनिर्वाह तंबाखूवर अवलंबून आहे, ही माहिती चुकीची असून 11 कोटी नागरिकांचे जीवन मोलाचे असल्यामुळेच गुटखा बंदी योग्यच आहे. गुटखाबंदी केल्यावर त्याविरोधात राज्यातील विविध न्यायालयांमध्ये तब्बल 20 याचिका दाखल झाल्या. मात्र, एकाही न्यायालयाने या बंदीला स्थगिती दिली नाही. चुकीच्या प्रिस्क्रिप्शनमुळे एकट्या अमेरिकेत वर्षाला 1 लाख रुग्ण बळी पडतात. औषध विक्री दुकांनात फार्मासिस्ट असणे बंधनकारक असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेऊ नका, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.