आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांच्या हाती माेबाइल देणे चुकीचे ; नेत्रतज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाने यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मूल वर्षाचे झाले की लगेच त्याच्या हातात माेबाइल दिला जाताे. त्यामुळे मुलांची डाेळ्याची बाहुली अाकुंचन पावते अाणि त्यातून मायाेपिया अाजार हाेताे. त्यामुळे लहान मुलांच्या हातात माेबाइल अजिबात देऊ नये अाणि द्यायचाच झाला तर ताे सहा वर्षांनी द्यावा, असे मत प्रसिद्ध नेत्रराेगतज्ज्ञ तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.  

मायाेपिया हा सरासरी जन्मापासूनच असताे किंवा ताे वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत हाेऊ शकताे. त्याची काळजी वेळीच घेतली नाही तर ताे वाढत जाताे. परिणामी डाेळ्याचा पडदा फाटून अंधत्व येऊ शकते.  कारण, या विकारात डाेळ्याची लांबी वाढल्यामुळे डाेळ्याचा पडदा ताणला जाताे. त्यामुळे ताे पातळ हाेऊन फाटताे. आनुवंशिक अस्थमा किंवा अन्य एखाद्या रुग्णात अाजार निर्माण झाल्यास मायाेपिया हाेऊ शकताे.  विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशात याचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.  

मुंबईत १,५०८ शाळांमध्ये साडेसात लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात अाले. या सर्वेक्षणात  चष्म्याचा नंबर अाहे, पण त्याची माहिती नाही, अशी ९१ हजार मुले अाढळली. 
 
७१ हजार मुलांना माेबाइलवर गेम खेळल्यामुळे  चष्मा लागलेला असल्याचे अाढळले.   शहरी भागात मायाेपियाचे प्रमाण जास्त अाहे. मायाेपिया आनुवंशिक असल्यास  ताे टाळता येत नाही. परंतु, अन्य कारणांमुळे हा विकार झाल्यास त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असल्यावर डाॅ. लहाने यांनी भर दिला.
बातम्या आणखी आहेत...