आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Funeral In Prison? Demeas Will Hand Over To Memon Family

याकूबचा दफनविधी तुरुंगातच? मेमन कुटुंबीयांना मृतदेह साेपवण्यावर विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेमन कुटुंबीयांच्या मुंबईतील माहिम परिसरात असलेल्या ‘अल हुसैन’ या निवासस्थानासमाेर पाेलिस बंदाेबस्त तैनात केला आहे.छाया : संदीप महाकाल - Divya Marathi
मेमन कुटुंबीयांच्या मुंबईतील माहिम परिसरात असलेल्या ‘अल हुसैन’ या निवासस्थानासमाेर पाेलिस बंदाेबस्त तैनात केला आहे.छाया : संदीप महाकाल
मुंबई - याकूब मेमनच्या मृतदेहावर कुठे अंत्यसंस्कार करण्यात येतील, यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता हा अंत्यसंस्कार नागपुरातच उरकून घेण्याची रणनीती राज्य सरकारने आखली आहे. दुसरीकडे, मेमन कुटुंबाने मृतदेह आपल्याला देण्यात यावा, अशी विनंती केली असून मुंबईच्या माहिम येथील कब्रस्तानात दफन करण्याची तयारीही त्यांनी चालवली आहे.

याकूबचा मृतदेह कुटुंबाला द्यायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारचा असतो. सरकारमधील वरिष्ठांनी मेमन कुटुंबाला मृतदेह देण्याऐवजी तो नागपुरातच दफन करण्याला सरकारचे प्राधान्य असेल, असे संकेत दिले. हा मृतदेह मुंबईत आला तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, दंगली भडकावण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती सरकारला वाटते. देशाच्या संसदेवर अतिरेकी हल्ला कटाचा सूत्रधार अफजल गुरूला फासावर
लटकावल्यानंतर त्याला तिहार तुरूंगातच दफन करण्यात आले होते. तसेच नागपूरच्या तुरूंगातच दफन करण्याची तयारी राज्य सरकारने केली असून यासाठी खास जागाही निश्चित करण्यात आली असल्याचेही उच्चपदस्थांनी सांगितले.

नागपुरातच कब्रस्तानात दफन करण्याची अट टाकून मृतदेह मेमन कुटुंबियांना द्यायचा किंवा मुंबईत माहिम कब्रस्तानात हा मृतदेह मुंबईत पोहोचताच दफन करण्याची अटीसह त्यांना सोपवायचा, असे पर्यायही सरकारतर्फे चाचपणी करून पाहिले जात आहेत. मात्र यापैकी नागपूर कारागृहातच मेमनला दफन करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे संकेत राज्य सरकारतर्फे देण्यात आले. कुटुंबाला मृतदेह द्यावा लागलाच तर अत्यंत कठोर अटी लादून तो द्यायचा किंवा पोलिसांच्या ताब्यात मृतदेह ठेवून केवळ कुटुंबाच्या उपस्थितीत नागपूर वा मुंबईतील
कब्रस्तानात मेमनवर सुरक्षेत अंत्यसंस्कार करायचे, या पर्यायांवरही विचार केला जात आहे.

पुढे वाचा, माहिमसाठी जय्यत तयारी