आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबच्‍या वकिलाने म्‍हटले, पैशासाठी लढलो नाही; कोर्टाचा निर्णय चूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद ग्रोवर - Divya Marathi
आनंद ग्रोवर
मुंबई – सन 1993 मध्‍ये मुंबईत झालेल्‍या साखळी बॉम्‍बस्‍फोटातील आरोपी याकूब मेमन याचे वकील आनंद ग्रोवर यांनी शेवटच्‍या क्षणापर्यंत याकूबला वाचण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांना पत्रकारांनी विचारलेल्‍या तिखट प्रश्‍नांवर ते खवळले आणि आणि म्‍हणाले, ''कोर्टाचा निर्णय मला अजिबात पटलेला नसून तो योग्‍य नाही. सुप्रीम कोर्टाकडून मोठी चूक झाली. ही केस मी पैशासाठी लढलो नाही’’, असा खुलासाही त्‍यांनी केला. याकूबला वाचण्‍यासाठी अर्ध्‍यारात्री मुख्‍य न्‍यायाधीशांच्‍या घरी वरिष्‍ठ वकिलांची टीम गेली होती. त्‍यात आनंद ग्रोवर यांच्‍यासह प्रशांत भूषण, युग मोहित, नित्या रामाकृष्णा आणि इतर 12 टॉप वकील होते.
असे दिले उत्‍तर
सुप्रीम कोर्टाने याकूबची याचिका फेटाळल्‍यानंतर आनंद ग्रोवर यांनी पत्रकारांच्‍या तिखट प्रश्‍नांची उत्‍तरे दिली. याकूबसाठी एवढ्या रात्री कोर्टात का आले, या प्रश्‍नांवर ते म्‍हणाले, ‘‘मी पैशासाठी आलेलो नाही,’’ असे उत्‍तर त्‍यांनी दिले. दहशवाद्याला वाचवण्‍याचा प्रयत्‍न का करत आहात, यावर ते म्‍हणाले, ‘‘भारतीय संविधानानुसार प्रत्‍येकाला मूलभूत अधिकाराने जगण्‍याचे स्‍वातत्र आहे’’, असे ते म्‍हणाले. त्‍यानंतर एखाद्या गरीब व्‍यक्‍तीसाठी तुम्‍ही कोर्टात एवढ्या रात्री यायला का, या प्रश्‍नावर ते म्‍हणाले, ‘‘ मी या अगोदर कोणत्‍या कोणत्‍या केस लढलो हे तुम्‍हाला माहिती आहे का’’, असा प्रतिप्रश्‍न त्‍यांनी करत आपण हे प्रसिद्धीसाठीही करत नसल्‍याचे सांगितले.
कोण आहेत आनंद ग्रोवर
आनंद ग्रोवर सुप्रीम कोर्टातील वरिष्‍ठ वकील आहेत. होमोसेक्सुअलिटी आणि एचआयव्‍हीची निगडित खटले लढवण्‍यासाठी ते ख्‍यातीप्राप्‍त आहेत. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने आनंद ग्रोवर यांना सीबीआय आणि ईडीचे रेप्रेजेंट करण्‍यासाठी पब्लिक प्रोसिक्यूटर म्‍हणूप नियुक्त केले होते.