आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडाे निष्पापांचे जिथे प्राण घेतले तिथेच याकूबची कबर खाेदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूबचा मृतदेह मुंबईत पाेहाेचताच त्याच्या माहिम परिसरातील निवासस्थानाबाहेर माेठी गर्दी झाली हाेती. (छाया : संदीप महाकाल) - Divya Marathi
याकूबचा मृतदेह मुंबईत पाेहाेचताच त्याच्या माहिम परिसरातील निवासस्थानाबाहेर माेठी गर्दी झाली हाेती. (छाया : संदीप महाकाल)
मुंबई - गुरुवारी मुंबईतला दिवस उजाडला तोच मुळी पोलिस बंदोबस्तात.. मुंबई शहर आणि उपनगरातल्या जवळपास प्रत्येक नाक्यावर पोलिसांचा फाैजफाटा.. मधूनच सावकाशपणे परिस्थितीचा कानोसा घेत जाणारी पोलिस व्हॅन... शहरातील एरवी वर्दळीच्या आणि व्यस्त वाहतुकीच्या भागातली गर्दीही तशीच.... मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारातही फारसा फरक नसला तरीही नेहमीच्या कोलाहलात एक अनामिक शांतता.. नागपूरच्या कारागृहात सकाळी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतरचे मुंबईतले हे सर्वसाधारण चित्र होते.

बाॅम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार असलेल्या याकूब मेमनला गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास फाशी दिली गेली. बाॅम्बस्फाेटाचा संपूर्ण कट मेमन कुटुंबीय राहात असलेल्या ज्या माहिम परिसरात शिजला होता. त्या परिसरातही या घटनेमुळे सकाळपासूनच तणावपूर्ण शांतता होती. वांद्रे येथून दादरकडे जाणा-या लेडी जमशेदजी या मुख्य रस्त्यापासून थोड्याशा आतल्या बाजूला असणा-या दर्गा परिसरात मेमन कुटुंबीय राहात असलेली अल हुसैनी ही इमारत आहे. माहिम पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मात्र ही जागा मुख्य रस्त्याला लागून असल्याने आणि कायदा सुव्यवस्थेची बाब लक्षात घेता, याच परिसरातल्या कापड बाजार भागातल्या बिस्मिल्ला मंजील या मेमन कुटुंबीयांच्या एका नातेवाइकाच्या घरी याकूबचा मृतदेह ठेवण्यात आला होता. दुपारी एक वाजता मृतदेह मुंबईत आणल्यानंतर जवळचे नातेवाईक आणि शेजा-यांच्या उपस्थितीत या ठिकाणी धार्मिक विधी उरकण्यात आला. संध्याकाळी मरिन लाइन्स भागातल्या बडा कब्रस्तान या स्मशामभूमीत याकूबवर अंत्यसंस्कार करण्यात आले. माहिमच्या कापड बाजार परिसरातील आसपासची दुकाने वगळता मुंबई शहर आणि खुद्द माहिम परिसरातही दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.

पुढे वाचा, श्रेय मुंबई पोलिसांना