आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज याकूबचा 'चालीसवां', खाऊ घातले जाईल बिर्यानी - चिकन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूब मेमन - फाइल फोटो - Divya Marathi
याकूब मेमन - फाइल फोटो
मुंबई - मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला 30 जुलै रोजी नागपूर कारागृहात फासवर लटकवण्यात आले होते. 9 सप्टेंबर रोजी त्याला चाळीस दिवस होत आहेत. बुधवारी त्याचे कुटुंबिया त्याचा 'चालीसवां' (धार्मिक विधी) करणार आहेत. या विधीनूसार त्याचे कुटुंबिया नातेवाइक आणि आप्त स्वकियांना बिर्यानी, कोरमा आणि चिकन खाऊ घालणार आहेत. या विधीमुळे याकूबच्या मुंबईतील माहिम भागातील घरी गर्दी वाढली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
मुस्लिम समुदायात मृत्यूनंतर होणाऱ्या विधींमध्ये तीजा, दसवां, चालीसवां आणि चार महिने दहा दिवसांनंतर होणारे विधी प्रमुख आहेत. तीजा आणि दसवा या विधी दरम्यान घरात कुरानाचे पठण आणि गरीबांना भोजनदान केले जाते. मृत्यूच्या चाळीसाव्या दिवशी चालीसवां हा विधी असतो.या दिवशी कुटुंबातील सदस्य आपापल्या परिस्थितीनूसार कार्यक्रम आयोजित करतात. यात प्रामुख्याने मोठ्या संख्येने लोकांना भोजनासाठी निमंत्रित करण्याची पद्धत आहे. यात सर्वात आधी कुराण पठन केले जाते. त्यानंतर सर्वजण एकत्र येऊन 'फातिहा' पढतात आणि नंतर भोजन केले जाते.

राहिन 'इद्दत'मध्ये
मुस्लिम धर्म परंपरेनूसार पतीच्या निधनानंतर पत्नी चार महिने दहा दिवस घराच्या चार भिंतीमध्येच असते. त्याला 'इद्दत' म्हटले जाते. या दरम्यान ती दुसऱ्या कोणत्याही पुरुषासमोर येऊ शकत नाही. याकूबची पत्नी राहिन देखील सध्या इद्दतमध्ये असल्याची माहिती आहे. या चाळीस दिवसांमध्ये मृत व्यक्तीची पत्नी धार्मिक पुस्तकांचे वाचन करते. मृत व्यक्तीच्या स्मरणात केल्या जाणाऱ्या चालीसवां विधी वेळीही ती तिच्याच खोलीत असते.
चार महिने दहा दिवसांनंतर काय होते
जवळपास 100 दिवसांचा कालावधीपूर्ण झाल्यानंतर मेमन कुटुंबात पुन्हा एक मोठा कार्यक्रम होईल. त्या दिवशी राहिनच्या माहेरची मंडळी तिच्यासाठी रंगित कपडे आणि हिरवा चूडा घेऊन येतील आणि तिला तो चढवला जाईल. नवे कपडे आणि बांगड्या घातल्यानंतर राहिन तिच्या खोलीतून बाहेर येईल. त्यानतंर कुरान पठण होईल आणि लोकांना मोठ्या प्रमाणात भोजन दिले जाईल.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय झाले होते 30 जुलैला