आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे याकूब मेमनची पत्नी राहिन, तुरुंगात दिला होता मुलीला जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूबची पत्नी राहिन - Divya Marathi
याकूबची पत्नी राहिन
मुंबई/नागपूर- याकूब मेमनची पत्‍नी राहीन हिला मुंबई ब्लास्टप्रकरणात सहआरोपी करण्‍यात आले होते. दुबईतून परतल्यानंतर पोलिसांनी तिला अटक करण्‍यात आहे. अनेक वर्षे ती तुरुंगातच होती. पतीला दहशतवादी कारस्थान करण्‍यात मदत केल्याचा राहीनवर आरोप आहे. राहिनला पोलिसांनी अटक केले तेव्हा ती गरोदर होती. तुरुंगात तिने मुलगी जुबैदा हिला जन्म दिला होता. अनेक वर्षे ती मुलीसोबत तुरुंगात होती. मात्र,‍ तिच्याविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावे मिळाले नाही. परिणामी राहिनची पुराव्याअभावी 2006 मध्ये जामिनावर सुटका झाली.

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस आधीच राहिन आपल्या मेमन परिवारासोबत दुबई मार्गे पाकिस्तान पसार झाली होती. पती निर्दोष असल्याचे तेव्हा राहिन सांगत होती. आता याकूबची मुलगी जुबैदा ही देखील आता वडिलांना निर्दोष सांगत आहे. याकूबला फासावर लटकवण्याआधी जुबैदा हिने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

याकूब मेमनची आई हनीफा मेमन ही गृहिणी आहे. तिचे प्रकृती खालावली आहे. तिच्यावरही मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते. याकूबला दहशतवादी कारस्थान करण्यासाठी तिने प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप आहे. मात्र, हनीफा मेमनच्या विरुध्द पुरावे न मिळाल्याने तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
मुलगा सुलेमान राहात होता विभक्त
याकूब मेमनचा मुलगा सुलेमान मेमन विभक्त राहात होता. सुलेमान याच्यावरही देशद्रोहाचा आरोप असून तो अनेक वर्षे तुरुंगात आहेत. परंतु त्याच्या विरोधान ठोस पुरावे न मिळाल्याने त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

मेमनच्या नावावर कोट्‍यवधींची प्रॉपर्टी
मेमन परिवाराकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मेमन परिवारातील बहुतांश सदस्यांनी सोने आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीतून कोट्‍यवधींची माया जमवली होती.

याकूब आधी भायखळा येथे नंतर तो मुंबईतील माहिम भागात राहात होता. माहिममधील अल-हुसैन बिल्डिंगमध्ये चौथ्या व पाचव्या मजल्यावर त्याचे फ्लॅट आहे. 1992 मध्ये मेमन परिवाराकडे सुमारे 20 कोटी रुपयांची प्रॉपर्टी होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो....