आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत \'हाय-अलर्ट\', वडिलांच्या बाजूला दफन केले याकूबला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूबचा मृतदेह त्याच्या माहिम येथील निवासस्थानी आणण्यात आले तेव्हा हजारो लोक उपस्थित होते. - Divya Marathi
याकूबचा मृतदेह त्याच्या माहिम येथील निवासस्थानी आणण्यात आले तेव्हा हजारो लोक उपस्थित होते.
मुंबई - गुरुवारी सकाळी फासावर लटकवण्यात आलेल्या याकूब मेमनला त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईत दफन केले. 12 मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूबला मरिन लाइन्सच्या बडा कब्रास्तानमध्ये वडिलांच्या कबरीजवळ दफन करण्यात आले. त्याआधी माहिमच्या दर्ग्यात त्याचा नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आला. त्यात अनेक लोक सहभागी झाले होते. याकूबच्या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात हाय-अलर्ट जारी केला होता.
याकूबचा मृतदेह पोलिस संरक्षणात कब्रस्तानापर्यंत नेण्यात आला. 20 पेक्षाही जास्त पीसीआर व्हॅन्स तेव्हा रस्त्यावर चालत होत्या. मुंबई पोलिसांनी 35 हजारांपेक्षाही जास्त जवान मुंबईच्या रस्त्यांवर तैनात केले होते. त्यात रॅपिड अॅक्शन फोर्स, क्यूआरटी, केंद्रीय बल आणि मुंबई पोलिस सहभागी होते.
पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना ताकिद दिली होती, की जनाजा काढला जाणार नाही, त्याच्यासोबत फक्त कुटुंबातील काही मोजके सदस्य असतील. पोलिसांनी याकूबच्या मृतदेहाचे फोटो घेण्यासही बंदी घातली होती. मात्र, जेव्हा नागपूरहून त्याचा मृतदेह माहिम येथील निवासस्थानी आणण्यात आला तेव्हा तिथे हजारो लोक उपस्थित होते. माहिममधील बिस्मिल्ला बिल्डिंगमध्ये याकूबचा भाऊ सुलेमान राहातो.

फाशीच्या वेळी हे होते उपस्थित
नागपूर मध्यवर्ती कारागृहात याकूबला फाशी देण्यात आली तेव्हा जिल्हाधिकारी, तुरुंग अधीक्षक, वरिष्ठ तुरुंग अधिकारी, पोलिस आयुक्त, तुरुंग महानिरीक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या पथकासह 20 वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फाशी यार्डमध्ये 6 जण होते. त्यावेळी तुरुंगाची संपूर्ण व्यवस्था कमांडो आणि क्यूआरटीच्या ताब्यात होती.

(बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पाहाटेपर्यंत काय-काय झाले जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)
कडक अटींवर दिला मृतदेह
याकूबला फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह कुठे दफन करायचा याबाबत कालपासून उत्सूकता होती. कैद्याला फाशी दिल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकार घेत असते. महाराष्ट्र शासनाने नागपूर कारागृहातच दफन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यामुळे कुटुंबियांच्या उपस्थितीत नागपूरमध्येच दफनविधी करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र नंतर कठोर अटींवर मृतदेह मुंबईला नेण्याची परवानगी देण्यात आली.
- पोलिसांच्या संरक्षणात कुटुंबिय दफणविधी करतील.
- कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 25 हजार पोलिस तैनात करण्यात आले.
LIVE UPDATES...
04.10 PM: याकूबसाठी माहिमच्या दर्ग्यात नमाज-ए-जनाजा पढण्यात आला.
...........................
03.00 PM: याकूबच्या फाशीला विरोध करणारे अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे, की एक कलाकार आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून मी फाशीचा विरोध करतो, पण न्याय देखील तेवढाच गरजेचा आहे.
...........................
02.20 PM: याकूबच्या माहिममधील निवास्थानाबाहेर हजारोंच्या संख्येने लोक गोळा झाले.
...........................
01:51PM: याकूबवर 4.30 वाजता दफनविधी.
...........................
01:40PM: सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे, की फासावर लटकवण्याची एवढी घाई दुर्भाग्यपूर्ण आहे. त्याचा दया अर्ज रद्द झाल्यानंतर आणि पिटीशन फेटाळल्यानंतर त्याला कायद्याने जेवढा वेळ मिळायला पाहिजे होता किमान तेवढा द्यायला पाहिजे होते. भारतीय न्यायप्रक्रियेसाठी हा दुःखद दिन आहे.
...........................
01:20PM: याकूब मेमनचे शव मुंबईतील माहिम येथील त्याच्या 'अल हुसैनी' या निवासस्थानी आणण्यात आले.
...........................
01:15PM: माहिम येथील याकूबच्या घरी पोहोचले पोलिस आयुक्त राकेश मारिया. मेमन कुटुंबियांना अंत्ययात्रा काढण्यास बंदी घातली. अतिशय निकटचे संबंध असलेलेच लोक दफनविधीसाठी उपस्थित राहाणार.
...........................
12.30 PM: पोलिसांनी छायाचित्रीकरणावर बंदी घातली.
...........................
12.20PM: याकूबचा मृतदेह घेऊन नागपूरहून निघालेले IndiGo flight 544 मुंबईत पोहोचले आहे.
...........................
12.00PM: काँग्रेस नेते शशी थरुर यांचे स्पष्टीकरण - मी एखाद्या स्पेशल केस करीता ट्विट केले नव्हते. मृत्यूदंडावर सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यायचा होता.
...........................
11.50AM: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता याकूब मेमनच्या फाशीवर निवेदन करणार
...........................
11.15AM: बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती म्हणाल्या - न्यायपालिकेने शेवटच्या क्षणापर्यंत सर्व न्यायिक प्रक्रिया पूर्ण केल्या. अशीच तत्परता इतरही प्रकरणांमध्ये दाखवली तर अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागतील.
...........................
10:50AM: मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया माहिममध्ये पोहोचले.
पुढील स्लाइडमध्ये, पोलिसांनी छायाचित्रीकरण बंदीसाठी काढलेला आदेश