आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yasin Bhatkal Charge Give To Mumbai Anti Terrorist Squad, Today Present Him In Court

यासीन भटकळचा मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडे ताबा, न्यायालयात आज हजर करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या आणि 2011 च्या मुंबईतील तिहेरी स्फोटातील दहशतवादी यासीन भटकळचा तिहार कारागृहातून मुंबई दहशतवादविरोधी पथकाने ताबा घेतला आहे. दिल्ली न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्नाटक पोलिसांकडून हा ताबा मिळाला असून भटकळला गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुंबईत 13 जुलै 2011 रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटाच्या अधिक तपासासाठी आपल्याला यासीन भटकळचा ताबा मिळावा अशी विनंती एटीएसने सप्टेंबर 2013 मध्ये दिल्ली सत्र न्यायालयात केली होती. त्यावर निर्णय घेत न्यायालयाने तिहार कारागृह अधीक्षकांना भटकळचा ताबा देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबई एटीएसने यासीन भटकळ आणि असदुल्ला अख्तर यांचा तिहार जेलमधून ताबा घेतला आहे. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी सध्या कर्नाटक पोलिसांमार्फत भटकळची चौकशी सुरू होती. 13 जुलै 2011 रोजी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादरच्या अ‍ॅन्टोनियो डिसिल्व्हा शाळेशेजारी ऐन गर्दीच्यावेळी तीन बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात 21 जण मृत्युमुखी तर 141 जण जखमी झाले होते.