आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटकळचे टार्गेट होते वानखेडे स्टेडियम, 2011च्या IPL सामन्यांदरम्यान होती स्फोटांची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहशतवादी यासिन भटकळने खळबळजनक खुलासा केला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) सुत्रांच्या माहितीनुसार, यासिन भटकळने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये स्फोट घडविण्याची तयारी केली असल्याचा खूलासा केला आहे.
यासिन भटकळच्या सांगण्यावरुन 20 एप्रिल 2011 रोजी दहशतवादी वकासने वानखेडे स्टेडियमची रेकी केली होती. विशेषम्हणजे, त्यावेळी मुंबईत आयपीएलचे सामने सुरु होते. 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स यांच्या दरम्यान सामना होता. वकासने या सामनचे तिकीट खरेदी केले आणि स्टेडियममध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याने स्टेडियमची रेकी केली, असल्याचे भटकळने चौकशीत सांगितले.
वानखेडे स्टेडियममध्ये स्फोट घडवून संपूर्ण देशाला हदरवून सोडण्याचा इंडियन मुजाहिदीनचा कट होता. यात सर्वाधिक जीवितहानीचीही शक्यता होती. 20 एप्रिलच्या सामन्यानतंर 22 एप्रिलला मुंबई विरुद्ध चेन्नईचा सामना होता. या सामन्यावेळीही वकास स्टेडियममध्ये गेला होता. त्यांची तयारी पूर्ण होती, मात्र स्टेडियमध्ये असलेली सुरक्षा यंत्रणा चोख असल्याने त्यांचा इरादा तडीस जाऊ शकला नाही.
सुत्रांनी सांगितले, की फेब्रुवारी 2011च्या शेवटी यासिन आणि वकास मुंबईत आला होता. त्यांच्यासोबत असदुल्ला हा आणखी एक साथीदार होता. यादरम्यान त्यांनी मुंबईच्या जुहू बीच आणि गोवा बीचची रेकी केली होती.