आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन: मुंबईच्या समुद्रात ‘विराट’ याेगसाधना; जॅकी श्रॉफ, पत्नी अमृतांसोबत सीएमने केला योग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद/अहमदनगर/नाशिक/सोलापूर- राज्यभरात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध शहरांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी भारतीय जैन संघटनेने दत्तक घेतलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत योगासने केली. पोलिस कर्मचाऱ्यांनीही यावेळी योगासने केली. 
 
-  मुंबईत नाैदल कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी भारतीय नाैदलातून निवृत्त करण्यात अालेली  युद्धनाैका ‘अायएनएस विराट’वर याेगाची अासने केली.

- साताऱ्यात सुधीर ससाणे या वकिलाने पोहण्याच्या तलावात योगासने केली. 
- सोलापूरात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी योगासने केली.
- नागपूर येथे नितीन गडकरी यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देताना आपण रोज 45 मिनिटे योगासने करत असल्याचे सांगितले. 
- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 
अहमदनगर येथे जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात पतंजली योग कर्मच्या वतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  अहमदनगर येथे योग शिबिरात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि पोलिस आयुक्त महादेव तांबडे उपस्थित होते.
 
औरंगाबाद येथे विविध 18 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घाटी रुग्णालयातही कार्यक्रम झाला. शहरात सरस्वती भुवन हायस्कूल, औरंगपुरा, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, मौलाना आझाद महाविद्यालय, रोजाबाग, बळीराम पाटील हायस्कूल, बजरंग चौक, धर्मवीर संभाजी हायस्कूल, एन-6, वसंतराव नाईक महाविद्यालय, जालना रोड, शिवछत्रपती महाविद्यालय, एन-3, एसपीआय, एन-12, उज्जवलाताई पवार शाळा, बीड बायपास, ज्ञानेश विद्यामंदीर, एन 2, एमजीएम संस्कार विद्यालय, मध्यवर्ती जकातनाका, रमाबाई आंबेडकर शाळा, एन-7 पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागसेनवन, पोलिस मुख्यालय, टीव्ही सेंटर, पोलिस आयुक्तालय, मिलकॉर्नर, दिव्य योग संस्था, सिध्दार्थ गार्डन या ठिकाणी युवक, युवती, नागरिकांसाठी योगाचे प्रशिक्षण घेतले. 
 
हेही वाचा.. 
बातम्या आणखी आहेत...