आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yog, Naturopathy Bill Draft Sanctioned In Cabinet Meet

योग, निसर्गोपचाराला प्राेत्साहन; मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजूरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - योग व निसर्गोपचार यांच्या विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यासह त्यांचे अध्यापन व व्यवसाय यांचे सुसूत्रपणे विनियमन करणे आवश्यक अाहे. त्यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक-२०१६ च्या मसुद्यास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता देण्यात आली. हे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यात येणार अाहे.

प्रस्तावित विधेयकानुसार, महाराष्ट्र योग व निसर्गोपचार परिषद स्थापन करण्यात येणार असून तिची घटना व रचना ही सध्या अस्तित्वात असणाऱ्या इतर राज्य परिषदांप्रमाणेच असेल. योग आणि निसर्गोपचार या क्षेत्रात नवीन शिक्षण संस्था व अभ्यासक्रम सुरू करणे, शिक्षण संस्थांना संलग्नीकरण प्रदान करणे, संशोधन संस्थांना मान्यता देण्यासह याबाबत शासनाला मार्गदर्शन करणे, योग व निसर्गोपचारामधील मान्यताप्राप्त शिक्षण संस्था व संलग्न रुग्णालयांसह याबाबतच्या केंद्रांची तपासणी करणे व त्यांना अधिस्वीकृती देणे, या क्षेत्रातील व्यवसायी व कर्मचाऱ्यांच्या नोंदी ठेवणे, त्यांच्यासाठी आचारसंहिता तयार करणे आदी कामे ही परिषद करणार आहे. नोंदणीकृत व्यवसायी किंवा कर्मचारी यांच्या गैरवर्तुणुकीबद्दल ही परिषद चौकशी करून कारवाई करू शकेल. त्याचप्रमाणे अर्हता व नोंदणीकृत नसताना व्यवसाय केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे.