आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाच्या नावाखाली तो महिलांशी करायचा अश्लील चाळे; पोहचायचा त्यांच्या बेडरुममध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग गुरु शिवम राऊत योगाच्या नावाखाली महिलांशी अश्लील चर्चा करायचा. - Divya Marathi
योग गुरु शिवम राऊत योगाच्या नावाखाली महिलांशी अश्लील चर्चा करायचा.
मुंबई- योगाच्या नावाखाली महिलांशी अश्लील गोष्टी करणाऱ्या योग गुरु शिवम राऊतला पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने तो अश्लील चर्चा करत असल्याचा ऑडिओ देखील पोलिसांना दिला आहे. 

पती नसताना जायचा घरी महिलांच्या घरी
- राऊत याच्या विरोधात 6 महिलांनी आतापर्यंत साक्ष दिली आहे. राऊतच्या विरोधात कलम 354 आणि 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत हा विवाहित आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. फिर्यादी महिला ही आरोपी राऊतच्या शिवम योग तीर्थ अकादमीत योग शिकण्यासाठी जात होती. अकादमी पुरुषांनी पुरुषांना आणि महिलांना महिलांना योग शिकविण्याचा नियम आहे.
 
महिलांशी करायचा अश्लील चर्चा
- राऊत हा महिलांच्या घरी त्यांचे पती नसताना जात असे. एक दिवस त्याने एका महिलेला आपले चुंबन घेण्यास सांगितले. त्यावेळी त्या महिलेने त्यांना आपण माझे गुरु आणि वडिलांसमान आहात. आपण अशी गोष्ट कशी करु शकता? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर एक दिवस तो तिच्या बेडरुममध्ये गेला. त्याने या महिलेला तु चुंबन घेतले नाही किमान पाणी तरी पाज असे म्हटले. ग्लासातील थोडे पाणी पिल्यावर त्याने हे पाणी या महिलेला पिण्यास सांगितले. असे केल्याने तुला आध्यात्मिक सुख मिळेल असे त्याने तिला सांगितले. यामुळे चिडलेल्या महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगण्याची धमकी दिल्यावर तो तिथून पळून गेला. 
बातम्या आणखी आहेत...