आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 लाख रुपयांसाठी करणार होता चिमुकल्याचे अपहरण, कट रचणाऱ्याला पोलिसांनी पकडले असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी आरोपीला चिमुकल्याच्या घराबाहेरच पकडले. - Divya Marathi
पोलिसांनी आरोपीला चिमुकल्याच्या घराबाहेरच पकडले.
मुंबई- गोरेगाव पोलिसांनी एका व्यावसायिकाच्या 5 वर्षाच्या चिमुकल्याला किडनॅप करण्याचा कट रचणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याच्या उद्देशाने तो हे कृत्य करणार होता. पण पोलिसांनी त्याच्या वेळीच मुसक्या आवळल्या आणि त्याला अटक केली. 
 
काय आहे पूर्ण प्रकरण
- पोलिसांच्या म्हणण्यानूसार त्यांना माहिती मिळाली होती की सूफियान अन्सारी (वय 22) हा शुक्रवारी गोरेगांव येथील जवाहरलाल नेहरु नगर येथील एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करणार आहे. 
- माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीची वाट पाहू लागले. 
- शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास आरोपी त्याच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडे अपहरणसाठी आणलेली रश्शी, चाकू आणि सेलोटेप सारख्या वस्तू होत्या.
 
कमी काळात कमवायचा होता अधिक पैसा
- पोलिसांना चौकशीत आरोपीने सांगितले की, तो एका टेलिकॉम कंपनीत काम करत होता. त्याची कमीत कमी कालावधीत अधिकाधिक पैसा कमविण्याची इच्छा होती. 
- त्यासाठी त्याने अपहरण करण्याचा निर्णय घेतला. आरोपी आणि अपहरण करण्यात येणारा चिमुकला पूर्वी जोगेश्वरी पूर्व येथे शेजारी राहत होते. 
- पण नंतर व्यावसायिकाचे कुटुंब गोरेगांव येथील जवाहर नगरमध्ये निवासी भागात फ्लॅट घेऊन राहु लागले.
- आरोपीने नंतर या चिमुकल्याचे अपहरण करण्याचा कट रचला. 
 
दहा लाखाची खंडणी मागणार होता आरोपी
- पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपीने या घरात कोण-कोण राहते याची माहिती काढली होती. त्याने अपहरण करुन 10 लाखाची खंडणी मागण्याचे ठरवले होते, त्याने तशी कबुली दिली आहे. त्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
  
बातम्या आणखी आहेत...