आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youth Congress 15 Percent Seats In Loksabha Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेसाठी युवक काँग्रेसला 15 टक्के जागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत तरुण चेहरे देण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल आहे. त्यामुळे काँग्रेसनेही जास्तीत जास्त तरुणांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना 10-15 टक्के जागांवर तिकीट दिले जाईल.

राहुल गांधी यांनी याबाबत अधिकृत घोषणी केली नसली तरी तशी तयारी मात्र पक्षांतर्गत सुरू झाल्याची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या एका नेत्याने दिली. या वेळी लोकसभा निवडणुकीत युवकांसाठी 10 ते 15 टक्के जागा काँग्रेसकडे मागण्याचे ठरले असून लवकरच अधिकृत घोषणाही करण्यात येईल. राज्यात युवक काँग्रेसच्या सदस्यांपैकी 60 लोकांशी राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यातील काहींना निश्चितच उमेदवारी मिळू शकणार आहे.