आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाच्या अपघाती मृत्यूनंतर संतप्त नागरिकांकडून सोलापूर-पुणे महामार्गावर 3 तास रास्ता रोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुर (माढा)- सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळ( ता. मोहोळ ) येथील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी सोलापूर-पुणे महामार्गावर 3 तास रास्ता रोको केला. शांतिनाथ कसबे(वय- 35) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेटफळ गावाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचे रखडलले काम त्वरीत पूर्ण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
 
या अपघातामुळे संतप्त झालेल्या भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यानी व शेटफळ ग्रामस्थांनी 3 तास आंदोलन करत युवकाचा मृतदेह रस्त्यावरच ठेवला. सोलापूर पुणे महामार्गावर यामुळे वाहनाच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. मृतांच्या कुटुंबियांनी यावेळी रस्त्यावरच आक्रोश करीत हंबरडा फोडला. शांतिनाथ कसबे हे मजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या घटनेची मोहोळ पोलिसात नोंद झाली असुन अज्ञात वाहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रास्ता रोको आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...