आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण रक्षणाचा ध्यास: मातीचे गणपती तयार करण्यासाठी मुंबईच्या तरुणाची एक महिना रजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हे आहेत आनंदाचं बीज असलेले मातीचे गणपती बाप्पा. त्यांची निर्मिती, पूजन व विसर्जनात कोणतेही जल-वायू-भू प्रदूषण होत नाही. म्हणजेच पूर्णपणे पर्यावरणपूरक. नावही खास... ट्री-गणेश! प्रत्येक मूर्ती लालमाती व जैविक खतांच्या मिश्रणातून घडवली जाते. मूर्तीत असतात भेंडीची पाचसहा बीजं. ज्या कुंडीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते, विसर्जनानंतर ती त्याच कुंडीत विरघळून जाते. पाच-सात दिवसांनंतर बीज उगवतात. काही दिवसांत लोक जैविक भाजी प्रसादाच्या रूपाने खातात.

३० वर्षांच्या दत्ताद्री कोठूर या तरुणाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्याने मुंबईच्या लोअर परेलमधील घरी गणेश ट्रीची निर्मिती आणि विसर्जनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. लोक या इको-फ्रेंडली गणेशमूर्तीपासून प्रेरणा घेतील, ही आशा त्यामागे होती. पुढच्याच दिवसापासून त्याला दररोज १५०-२०० फोन घेऊ लागले. त्यातील अनेक परदेशांतूनही होते. सर्वांना ट्री गणेश बनवणे शिकायचे होते. दत्ताद्री म्हणाला, मला दुकान थाटायचे नाही. बाप्पाबद्दल श्रद्धेसोबत निसर्ग सौंदर्याचेही भान ठेवा, प्रदूषण टाळा, अशी जागरुकता लोकांमध्ये आणायची होती. दत्ताद्री मुंंबईच्या ओ अँड एम कंपनीत वरिष्ठ कला दिग्दर्शक आहे. दरवर्षीप्रमाणे गतवर्षीही तो जुहू चौपाटीवरील विसर्जनात सहभागी झाला होता. विसर्जित मूर्ती पायाखाली तुडवल्या जात असल्याचे दिसल्याने त्याची आस्था दुखावली. यानंतर त्याने त्याचे गुरू सूर्यकांत शिंदे यांच्याकडून गणपती घडवण्याची कला शिकली. याच दरम्यान प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त आणि निसर्गाचे रक्षण करणाऱ्या ट्री गणेशची कल्पना त्याला सुचली. दत्ताद्रीने कंपनीतून महिनाभराची सुटी घेतली. घराच्या छतावरच स्टुडिओ तयार केला आहे. पाचसहा मित्रही त्याला मदत करत आहेत. तो सकाळी ११ वाजेपासून रात्री नऊपर्यंत ट्री गणेश तयार करतो. त्याची एक वेबसाइटही आहे. यंदा बुकिंगसाठी पाच हजारांपेक्षा जास्त फोन आले, पण त्याने ५०० मूर्तींचेच बुकिंग केले. जास्तीत जास्त लोकांनी इको-फ्रेंडली गणेश आणावेत यासाठी महाराष्ट्राचे प्रदूषण नियंत्रण मंडळही त्याच्या कामाचा प्रचार-प्रसार करत आहे.
बातम्या आणखी आहेत...